अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- पश्चिम बंगाल-ओडिसा मध्ये अम्फान चक्रीवादळाच्या संकटाचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला होता. मागील तीन दिवसांपासून या वादळाने कोलकाता, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये रुद्र रुप धारण केलं आहे.
यात कोट्यवधींचे नुकसान झाले असून 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वादळ येण्यापूर्वी ओडिशातील जवळपास 58 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होत.
चक्रीवादळ बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलामधील हटिया बेटच्या किनाऱ्यावर पोहोचलं. चक्रीवादळानं किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात कहर माजवला.
वाऱ्याचा वेग एवढा जास्त होता की अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, वीजेचे खांब रस्त्यांवर पडले तर घर आणि अनेक इमारतींची छप्पर उडून गेली आहेत.
या चक्रीवादळाचा मोठा फटका पश्चिम बंगालमध्ये बसला आहे. हे नुकसानं एवढं मोठं आहे की शब्दात व्यक्त करता येणार नाही.
साधारण 1 लाख कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे पण नेमकं किती नुकसान झालं हे कळायला काही दिवस लागतील असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com