अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा अहमदनगर शहरामध्ये तीव्र पडसाद उलटल्याचे चित्र दिसून आले.
उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे एका युवतीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना १ महिन्यात फाशी देण्यात यावी अन्यथा संपूर्ण देशभरात रस्त्यावर ऊतरून आंदोलन करण्यात येईल
असा इशाराच आंदोलन कर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून देण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथसर येथे दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून निघृणपणे मारहाण करण्यात आली होती.
या मुलीचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना १ महिन्यात फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे अन्यथा देशभर तीव्र पडसाद उमटल्याशिवाय राहणार नसल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved