अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली आहे.
मनोहर पर्रिकर यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हा निर्णय घेतला असून मला निवडून द्यायचे की नाही हे आता पणजीतील जनतेनेच ठरवायचे आहे, असे उत्पल पर्रिकर यावेळी म्हणाले आहेत.
याबाबत उत्पल पर्रीकर बोलताना म्हणाले की, मतदारांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिले होते. कारण पर्रिकर हे मूल्यांच्या बाजूने होते. त्यामुळे मी या मुद्द्यांच्या बाजूने असून, माझ्या वडिलांनी हा पक्ष मजबूत केला आहे.
तसेच मलाही पणजीत हा पक्ष मजबूत करायचा असून मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिले गेले.
त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार आहे, अशी मोठी घोषणा उत्पल पर्रीकर यांनी आज केली आहे माझे राजकीय करिअर मी पणजीच्या लोकांच्या हाती ठेवले आहे.
मी कोणत्याही पद आणि मंत्रीपदासाठी लढत नाही. मूल्यांसाठी माझी लढाई आहे. हे युद्ध कठीण आहे. मला काही तरी मिळेल यासाठी मी काही करत नाही.
पणजीचे लोक 30 वर्ष माझ्या लोकांसोबत होते. येथील वर्ग उच्च शिक्षित आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जात आहे. माझ्या वडिलांची जी इमेज होती तीच इमेज मला द्यायची होती. मी पक्षातून त्यासाठी प्रयत्न केला. पण त्यात मी यशस्वी झालो नाही, अशी खंतही यावेळी उत्पल यांनी व्यक्त केली आहे