Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Virat Kohli And Gautam Gambhir Fight History : विराट कोहली आणि गौतम गंभीरची दुष्मनी आहे तब्ब्ल १० वर्षे जुनी, जाणून घ्या त्यांच्यातील वादाबद्दल

Virat Kohli And Gautam Gambhir Fight History : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि लखनौ सुपरजाईंट संघाचा कोच गौतम गंभीर यांच्यामध्ये आयपीएलमधील वाद हा काही नवा नाही. या दोघांमधील वाद तब्बल १० वर्षे जुना आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आरसीबी आणि एलएसजी या संगमध्ये झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या दोघांच्या वादात गौतम गंभीरने देखील उडी घेतल्याचे सर्व देशाने पाहिले आहे.

गौतम गंभीर आणि विराट कोहलीचा वाद हा इतका टोकाला पोहोचला की त्यांच्या या वादामध्ये इतर खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. त्यामुळे बीसीसीआयकडून या तीनही खेळाडूंकडून दंड आकाराला आहे.

कृणाल पांड्याचा झेल घेतल्यानंतर कोहलीने स्टँडकडे पाहिले आणि तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याचा इशारा केला. त्यानंतर हा वाद आणखी चिघळ्याचे पाहायला मिळाले. पण या दोघांमधील वाद हा काही नवा नाही.

नवीन उल हक यांनी हा मुद्दा उपस्थित केला

आरसीबी आणि लखनौच्या सामन्यामध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये वाद झाला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. त्यानंतर आरसीबीने सामना जिंकल्यानंतर हस्तांदोलनाच्या वेळी नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद झाला. त्यानंतर गौतम गंभीरचा देखील पारा चढला.

के.एल. राहुलने मध्यस्थी केली

Virat Kohli and Gautam Gambhir

सामना संपल्यानंतर काइल मेयर्स हा विराट कोहली यांच्याकडे गेला आणि काहीतरी चर्चा करू लागला. त्यानंतर गौतम गंभीर तिथे गेला आणि काइल मेयर्सला घेऊन जाऊ लागला. त्यांनतर विराट आणि गंभीर या दोघांमध्ये वाद सुरु झाला. यावेळी के.एल. राहुलने मध्यस्थी करत प्रकरण शांत केले.

2013 मध्ये दोघांमध्ये वाद सुरू झाला

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामधील वाद हा जवळपास १० वर्षे जुना आहे. दोघांमध्ये पहिली लढत 2013 च्या मोसमात झाली जेव्हा विराट आरसीबीचे नेतृत्व करत होता. दुसरीकडे, गौतम गंभीर केकेआर संघाचे नेतृत्व करत होता.

यावेळी दोन्ही संघाचे कर्णधार विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याठिकाणी उपस्थित खेळाडूंनी हे प्रकरण शांत केले.

2016 मध्येही गौतमला राग आला होता

पण 2016 मध्ये जेव्हा या दोघांची टीम आमनेसामने आली तेव्हा पुन्हा दोघे आमनेसामने आले. खरं तर, 183 धावा केल्यानंतरही केकेआरच्या संघाने आरसीबीकडून सामना 1 विकेटने गमावला.

19व्या षटकात, सामना आपल्या हातातून निसटताना पाहून गौतम गंभीरला राग आला आणि त्याने नॉन-स्ट्रायकरच्या टोकाकडे चेंडू टाकला जिथे विराट कोहली धाव पूर्ण केल्यानंतर आधीच उभा होता.