अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-जर आपण म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल तर आपल्याला या गुंतवणूकीचे नियम समजून घ्यावे लागतील. सहसा पाहिले जाते की गुंतवणूकदार कधी कधी घाबरतो आणि पैसे काढून घेतो.
याचा तोटा त्याला सहन करावा लागतो. कोणताही मिडिल क्वारटाइल इक्विटी म्यूचुअल फंड घ्या आणि आधीचा कोणताही 10 वर्षांचा एसआयपी कालावधी घ्या, आपणास आढळेल की त्यांचे वार्षिक परतावा इतर सर्व मालमत्ता वर्गापेक्षा जास्त आहे.
एसआयपी सुरू करणारे सर्व गुंतवणूकदार परतावा मिळविण्यास सक्सेस होत नाहीत. जर आपण गुंतवणूकदार असाल तुम्हाला यशस्वी एसआयपी गुंतवणूक करायची असेल तर हे तीन आपल्याला मदत करू शकतात.
नियम 1: गोष्टी कशा कार्य करतात ते समजून घ्या :-अनेक गुंतवणूकदार जे रिकर्निंग डिपॉझिट आणि पीएफ सारख्या फिक्स्ड रिटर्न असेट्स कडून एसआयपीकडे जातात प्रत्यक्षात तर तसे करतात कारण त्यांना याविषयी अधिक माहिती नसते. ५-१० वर्षांच्या कालावधीत १२-१४% मागील रिटर्नकडे लक्ष वेधून ते असे
गृहीत धरतात की हे उत्पन्न खरोखरच तसे होणार नाही. अशी असंख्य उदाहरणे आहेत ज्यात पहिल्या दोन किंवा तीन वर्षांत एसआयपी परतावा नकारात्मक होता आणि आठवड्यात किंवा काही महिन्यांनतर वार्षिक आधारावर परतावा 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला.
नियम 2: बंद-सुरू-बंद असे नका करू: – हे सहसा पाहिले गेले आहे की गुंतवणूकदार कधीकधी इक्विटी बाजाराच्या अस्थिरतेच्या आधारे एसआयपी बंद करतात आणि कधी कधी सुरु करतात. गुंतवणूकदार सामान्यत: मार्केटच्या चक्रात काय प्रतिक्रिया देतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
मार्केटमधील तेजी गुंतवणूकदारांमध्ये खूप उत्साह भरते. जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा बरेच गुंतवणूकदार एसआयपी सुरू करतात. कारण त्यांना हि तेजी आकर्षित करते. पण जेव्हा मंदीचे चक्र येते तेव्हा बहुतेक गुंतवणूकदार निराश होतात आणि घाबरतात. ते एसआयपी थांबवतात. असे न करता नियमित आणि दीर्घकालीन गुंतवणूक सुरु ठेवली पाहिजे.
नियम 3: आपले ध्येय समोर ठेवा :-उतार चढ़ाव असणाऱ्या ग्रोथ असेट्समध्ये पद्धतशीर गुंतवणूक तेव्हाच चांगले कार्य करते जेव्हा आपले लक्ष्य समोर आणि स्थिर असते. विशेष म्हणजे 3681 रुपये प्रतिमाह सारख्या रैंडम नंबरची एसआयपी बरीच काळ सुरू राहते तर 4000 रुपयांच्या राउंड फिगर असलेल्या एसआयपी कमी शिस्तबद्ध असतात.
राउंड फीगर एसआयपी विचारपूर्वक केले जात नाही :- हे असे यामुळे घडते कि कारण आपल्या रँडम राशीच्या एसआईपी ची निवड सेवानिवृत्तीचे किंवा आपल्या मुलाचे शिक्षण लक्षात घेऊन रँडम रकमेची एसआयपी जास्त विचारपूर्वक निवडली जाते. राउंड फीगर असलेली एसआयपी कधीही सुरू केली जाते. उत्कृष्ट परीणामांसाठी, एसआयपी सुरू करण्यापूर्वी एक आर्थिक योजना तयार करा. त्याच्या प्रगतीचा मागोवा ठेवा.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved