अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि देशाचे आर्थिक वर्ष 31 मार्च 2021 रोजी संपेल. अशा परिस्थितीत, जर आपण अद्याप प्राप्तिकर वाचवण्यासाठी गुंतवणूक केली नसेल तर आपण बँकांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीचा विचार करू शकतात.
येथे केलेली गुंतवणूक सुरक्षित तर असेलच परंतु चांगले व्याज देखील मिळते. जर आपणास बँकांच्या टॅक्स सेव्हिंग एफडी मध्ये पैसे लावायचे असतील तर आम्ही तुम्हाला याठिकाणी टॉप 10 बँकांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीचे व्याज दर सांगणार आहोत .
अशा एफडीमध्ये आपण 5 वर्षानंतरच पैसे काढू शकता. चला या एफडीचे व्याज दर जाणून घेऊया.
– एसबीआय बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वसामान्यांना 5.30% व्याज, ज्येष्ठ नागरिकांना 5.80% व्याज देत आहे. आईसीआईसीआई बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वसामान्यांना 5.35% व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.85% व्याज देत आहे.
– एचडीएफसी बँक सामान्य लोकांना टॅक्स सेव्हिंग एफडीवर 5.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के व्याज देत आहे.
– कॅनरा बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वसामान्यांना 5.30% व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.80% व्याज देत आहे.
– अॅक्सिस बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वसामान्यांना 5.75% व्याज, ज्येष्ठ नागरिकांना 6.25% व्याज देत आहे.
– बँक ऑफ बडोदा टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वसामान्यांना 5.30 टक्के व्याज देत आहे, तर 5.80 टक्के ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहेत.
– आयडीएफसी बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वसामान्यांना 6.75% व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना 7.25% व्याज देत आहे.
– कॉरपोरेशन बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वसामान्यांना 5.45%, ज्येष्ठ नागरिकांना 5.95% व्याज देत आहे.
पीएनबी बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वसामान्यांना 5.30 % व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 6.05% व्याज देते.
आयडीबीआय बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वसामान्यांना 5.30% व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना 5.90% व्याज देत आहे.