Washing Machine : वॉशिंग मशीन खरेदी करण्यापूर्वी अवश्य जाणून घ्या या गोष्टी, अन्यथा होईल….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Washing Machine : दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक नवनवीन बदल होत आहेत. त्यामुळे मानवी जीवनात सर्वच गोष्टी सहजपणे करणे शक्य झाले आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुकर होत आहे. वॉशिंग मशीन आल्याने महिलांना कपडे धुण्यात खूप मदत होत आहे.

आजकाल अनेक महिला कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करत आहेत. तसेच अनेक महिला नवीन वॉशिंग मशीन खरेदी करत आहेत. पण नवीन वॉशिंग मशीन खरेदी करण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

वॉशिंग मशीन खरेदी करत असताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. अन्यथा तुमचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

सर्व प्रथम हे लक्षात ठेवा

तुम्हाला नवीन वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी सर्वात प्रथम कंपनी ठरवावी लागेल. तसेच त्या वॉशिंग मशीनची क्षमता किती आहे देखील पाहावे लागेल. तुमच्या घरात 2 लोक असतील तर 6KG पर्यंतचे वॉशिंग मशीन तुमच्यासाठी योग्य असेल. जर 4 लोक राहत असतील तर 7KG पर्यंतचे वॉशिंग मशीन योग्य असेल. तर, 5 पेक्षा जास्त लोक असल्यास 9KG वॉशिंग मशीन ठीक होईल.

ही वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे

वॉशिंग मशीन खरेदी करत असताना जी वॉशिंग मशीन खरेदी करत आहे ती परिपूर्ण वैशिष्ट्यांनी पूर्ण असावी. वॉशिंग मशीनमध्ये इन्व्हर्टर तंत्रज्ञान असावे. जेणेकरून तुमची वीज नसली तरी वॉशिंग मशीन चालेन आणि विजेची बचत देखील होईल.

वॉशिंग मशिनमध्ये ही वैशिष्ट्ये असल्यास ती खास आहे

जर तुम्ही फ्रंट लोड वॉशिंग मशीन खरेदी करत असाल तर लक्षात ठेवा की त्यामध्ये डायरेक्ट मोटर असावी. तसेच मशीनमध्ये प्री-सोक ऑप्शन देखील असावा. हे फीचर्स तुम्हाला तुमचे अतिशय खराब कपडे धुण्यास मदत करेल.

घरात जर लहान मुले असतील तर चाइल्ड लॉक असलेले वॉशिंग मशिन खरेदी करावे. या फीचर्समुळे घरातील लहान मुलांना कोणताही धोका निर्माण होत नाही. त्यामुळे या फीचर्सचा चांगला फायदा होत आहे.