अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- वेगवेळ्या देशात फिरल्यानंतरच तेथील कल्चर, रुल्स आणि लोकांविषयी माहिती मिळू शकते. परंतु काही देशांमध्ये जाण्याअगोदर बॅग पॅकिंग करताना त्यामधून ब्लू जींस, पिवळे कपडे आणि आपल्या फेव्हरेट रंगाच्या फ्लिप-फ्लॉप्स काढून टाका, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकते.
नॉर्थ कोरियामध्ये पुरुष आणि महिलांना दोघांनाही ब्लू जींस घालण्यावर बंदी आहे. ब्लू कलर यूनायटेड स्टेट्सशी संबंधीत आहे यामुळे नॉर्थ कोरियामध्ये या रंगावर बंदी आहे. नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग. आपल्या देशातील लोकांना निळ्या रंगाची जीन्स परिधान केल्यास भयावह शिक्षा देतो.
खरेतर निळ्या रंगाची जीन्स ही जगभरातील लोकांची पहिली पसंत आहे. किम जोंग उनने आपल्या देशात निळ्या रंगाच्या जीन्सवर बंदी घातली आहे. किम जोंग उन अमेरिकेला आपला शत्रू मानतो. किम जोंग उनचे म्हणणे आहे, की निळ्या रंगाची जीन्स हे अमेरिकन साम्राज्यवादाचे प्रतीक आहे.
म्हणून त्याने संपूर्ण देशातच निळ्या रंगाची जीन्स परिधान करण्यावर बंदी घातली आहे. जर कुणी चुकूनही या नियमाचे उलंघन केले, तर त्याला सरळ जेलमध्ये टाकले जाते आणि कठोर शिक्षा दिली जाते. एवढेच नाही, तर किमने आपल्या देशात इंटरनेट वापरावरही बंदी घातली आहे.