Weather Forecast: देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे आता भारतीय हवामान विभागाने 3 ते 5 एप्रिल दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे याच बरोबर देशातील इतर राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 5 एप्रिलनंतर दिल्ली, नोएडा, बिहार, झारखंड, यूपी, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे त्याच वेळी देशभरातील तापमान सामान्यपेक्षा 3-4 अंशांनी कमी राहण्याचा अंदाज आहे.
IMD नुसार, पश्चिम हिमालयीन प्रदेशांसह वायव्य भारताच्या मैदानी भागात हलका पाऊस पडू शकतो. यासोबतच हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये 3 आणि 4 एप्रिल रोजी उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून, त्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
दुसरीकडे, दक्षिण भारतात, पुढील 5 दिवसांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये अनेक ठिकाणी गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
15 एप्रिलनंतर विविध भागात तापमानात वाढ नोंदवली जाईल. विशेषत: बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात 15 एप्रिलनंतर उष्णतेची लाट दिसून येईल.
दिल्ली आणि आसपासच्या भागात दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि हलका पाऊस पडू शकतो. यासोबतच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाऱ्यासह गारपीटही होऊ शकते. यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्टही जारी केला आहे.
हवामानातील बदल केवळ वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेच दिसत आहेत. जेव्हा वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या दिशेने येतात तेव्हा त्यांच्या आर्द्रतेचे रुपांतर पाऊस आणि बर्फात होते. काही वेळा ते जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या उत्तरेकडील पर्वतीय राज्यांमध्ये तसेच उत्तर पूर्वेकडील राज्यांकडे जातात, तर काही वेळा ते पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून दक्षिणेकडे जातात. आता जे बदल होत आहेत ते यामुळे घडत आहेत.
हे पण वाचा :- PM Mudra Yojana: मोठी बातमी ! व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार 10 लाख रुपये ; असा करा अर्ज