Categories: भारत

शेजारणीला बाईक शिकवायला गेला..आणि त्याच्यासोबत झाले असे काही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडू नका असं प्रशासनाने वेळोवेळी ओरडून सांगितलं आहे. परंतु काही बहाद्दर ऐकायचं नाव घेत नाही. यात अनेक मजेशीर घटनाही घडल्या आहेत. अशीच एक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे.

गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोलिसांना  एक महिला बाईक चालवत असल्याचं दिसलं. तिच्या पाठीमागे एक तरुण होता. पोलिसांना बघून ते बहुधा घाबरले होते.

बाईक एका चौकातून वळवताना महिलेचं संतुलन बिघडलं, बाईकचा वेग कमी असल्याने दोघे पडले खरे मात्र त्यांना फार लागलं नाही. पोलीस पटकन त्यांच्या मदतीसाठी धावले आणि त्यांना बाहेर पडण्याचं कारण विचारलं.

सुरुवातीला महिला आणि तरुणाने अशीच फेकाफेकी करून बघितली, मात्र पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच   तरुणाने सांगितलं की तो या महिलेच्या शेजारी राहतो आणि महिलेला बाईक शिकायची होती म्हणून तो शिकवत होता.

पोलिसांनी तरूणाकडे वाहन चालवण्याचा परवाना मागितला. तो त्याच्याकडे नव्हता. गाडीची कागदपत्रे मागितली ती देखील त्याच्याकडे नव्हती.

दोघांपैकी एकानेही हेल्मेट घातलेलं नव्हतं. यामुळे पोलिसांनी या दोघांविरूद्ध कारवाई केली आणि 3500 रुपयांचा दंड वसूल करून दोघांना सोडून दिलं.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24