भारत

New Pension Scheme : सरकारच्या नवीन पेन्शन योजना काय आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर…

Published by
Ahmednagarlive24 Office

New Pension Scheme : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सादर केल्या जात आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक पेन्शन योजना आणल्या आहेत. या पेन्शन योजनांचा फायदा निवृत्तीनंतर नागरिकांना होत आहे.

६० वर्षानंतर सरकारच्या पेन्शन योजनेचा लाभ अनेकांना होत आहे. देशात महागाई इतकी वाढली आहे की निवृत्तीनंतर अनेकांना कुटुंब चालवणे कठीण होऊन जाते. म्हातारपणात चांगले दिवस घालवायचे असतील तर सरकारच्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता.

सरकारच्या पेन्शन योजनेत जर तुम्ही गुंतवणुक केली तर ६० वर्षानंतर दर महिन्याला 3000 पेन्शन दिली जाईल. 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील नागरिक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात.

अटल पेन्शन योजना

या योजनेत 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील नागरिक गुंतवणूक करू शकतात. ज्यावेळी तुमचे वय ६० वर्षे होईल तेव्हा तुम्हाला दरमहा 1000 ते 5000 पर्यंत पेन्शन मिळेल. यासाठी तुम्हाला दरमहा काही पैसे गुंतवावे लागतील.

श्रम योगी मानधन पेन्शन योजना

देशातील सर्व गरीब कुटुंबातील नागरिक श्रम योगी मानधन पेन्शन योजनेत अर्ज करू शकतात, ज्यांचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान आहे, तुम्ही जितके कमी वयात अर्ज कराल तितके कमी पैसे तुम्हाला सरकारच्या या योजनेत गुंतवावे लागतील. कोणत्याही मान्यताप्राप्त बँकेला भेट देऊन माहिती मिळवू शकता.

जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी अर्ज केला तर तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील, जेव्हा तुम्ही 60 वर्षांचे व्हाल तेव्हा तुम्हाला दरमहा 3000 पेन्शन मिळू लागेल.

जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी अर्ज केला तर तुम्हाला 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील, त्यानंतर तुम्हाला दरमहा 3000 पेन्शन मिळेल.

किसान मानधन पेन्शन योजना

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी किसान मानधन पेन्शन योजना सुरु केली आहे. अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. १८ ते ४० वर्षे वयोगटातील नागरिक यो योजनेत गुंतवणूक करू शकतात.

दरमहा या योजनेत तुम्हाला 55 रुपये प्रीमियम रक्कम भरावी लागेल. ६० वर्षानंतर तुम्हाला यो पेन्शन योजनेतून तुम्हाला दरमहा ३००० हजार रुपये पेन्शन दिली जाईल.

Ahmednagarlive24 Office