Bloodwood Tree : जगातील निसर्गात अशा काही गोष्टी आढळून येतात ज्या पाहून तुम्हीही चकित होत असाल. तसेच नैसर्गिक गोष्टी आजही खूप महत्वाच्या आहेत. आजही नैसर्गिक साधनातून अनके रोगांवर उपाय मिळत आहेत. तसेच वैज्ञानिकही निसर्गामध्ये अनेक रोगांवरील औषधे शोधत आहेत.
पण जर तुम्हाला असे सांगितले की जगात याक असे झाड आहे जे कापल्यानंतर त्यामधून रक्त निघते. तर तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. असे एक झाड आहे जे कापल्यानंतर मानवाच्या रक्तासारखे रक्त निघते.
हे झाड खूप महत्वपूर्ण देखील आहे. या झाडापासून अनेक रोगांवर उपाय देखील केले जाऊ शकतात. त्यामुळे या झाडाला महत्वपूर्ण आणि रोगांवरील रामबाण उपाय म्हणून देखील ओळखले जाते.
‘सेरोकार्पस अँगोलेन्सिस’
या झाडाबद्दल बोलायचे झाल्यास या झाडाला ब्लडवुड ट्री म्हणून देखील ओळखले जाते. तसेच या झाडाला कियाट मुकवा किंवा मुनिंगा असेही म्हणतात. त्याचे वैज्ञानिक नाव सेरोकार्पस अँगोलेन्सिस असे आहे.
हे झाड जास्त करून आफ्रिकेमध्ये आढळते. तसेच मोझांबिक, नामिबिया, टांझानिया आणि झिम्बाब्वे या देशांमध्ये देखील हे झाड आढळून येते. हे देश सोडून इतर कोणत्याही ठिकणी हे झाड आढळून येत नाही.
झाडाचा रस फायदेशीर
हे झाड खंगूप कमी प्रमाणात आढळते. त्यामुळे या झाडाला खूप महत्व आहे. हे झाड कापल्यानंतर त्यामधून लाला रंगाचे रक्त बाहेर पडते. पण ते रक्त नसून झाडामधून बाहेर पडलेला एक प्रकारचा द्रव असतो. पण ते मानवाच्या रक्तासारखेच दिसते.
अनेक रोगांवर रामबाण उपाय
या झाडापासून अनेक मानवी औषधे बनवली जातात. त्यामुळे हे झाड औषधी असल्याचे मानले जाते. तसेच मानवाचे रक्ताचे आजार देखील बरे होतात असे तज्ञांकडून सांगण्यात येते.
या झाडापासून डोळ्यांच्या समस्या, पोटाचे आजार, मलेरिया किंवा गंभीर दुखापत बरे करण्याची क्षमता आहे. तसेच या झाडाचे लाकूड देखील खूप मौल्यवान आहे. या झाडाचे लाकुड खूप महाग विकले जाते. झाडाची सरासरी लांबी 12 ते 18 मीटर पर्यंत असते.
या झाडापासून अनेक आजार बरे होत असल्याने झाडाला जास्त मागणी आहे. या झाडापासून निघालेल्या द्रवापासून अनेक प्रकारची मानवी औषधे बनवली जातात. त्यामुळे मानवासाठी हे झाड रामबाण उपाय आहे.