Budget 2023 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा ७५ वा अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. या अर्थसंकल्पातून अनेकांना मोठी अपेक्षा आहे. मोदी सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. निर्मला सीतारामन या पाचव्यांदा अर्थसंकल्प जाहीर करत आहेत.
मोदी सरकारकडून टॅक्स स्लॅबमध्ये कपात करण्यात आल्याची मोठी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. जुनी करप्रणाली रद्द करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पानंतर काही वस्तू महाग झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर बोजा पडणार आहे तर काही वस्तू स्वस्त झाल्याने पैसे वाचणार आहेत.
संसदेत अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या वस्तू महाग झाल्या आणि कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या याबाबात माहिती दिली आहे. चला तर जाऊन घेऊया काय स्वस्त आणि काय महाग झाले?
मोबाईल फोन-ईव्ही स्वस्त होईल
अर्थसंकल्पनंतर इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार आहेत. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे. कारण इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरींवरील कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे.
मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणार्या लिथियम बॅटरींवरील कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल आणि इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार आहेत.
या वस्तू झाल्या स्वस्त
खेळणी
सायकल
भ्रमणध्वनी
मोबाइल कॅमेरा लेन्स
ऑटोमोबाईल
इलेक्ट्रिक वाहन
लिथियम बॅटरी
नेतृत्व दूरदर्शन
बायोगॅसशी संबंधित गोष्टी
महाग झाल्या या वस्तू
सोने, प्लॅटिनम
विदेशी चांदी
हिरे
सिगारेट
पितळ
परदेशी खेळणी
कपडे
गरम कॉइल्स
एक्स-रे मशीन