What Is Solar Halo : आकाशात सतत काही ना काही हालचाल होत असते. जर आकाशामध्ये दररोजपेक्षा नवीन काही तरी दिसले तर त्याची चर्चा सर्वत्र होत असते. आकशाबद्दल सर्वांनाच काही ना काही नवीन ऐकण्याची किंवा पाहण्याची उत्सुकता नेहमी लागलेली असते.
जगातील प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल आकाशातील अनेक ग्रहावरील माहिती आणि फोटो जगासमोर आले आहेत. तसेच चंद्र या ग्रहाबद्दल सर्वच जगाला नेहमी उत्सुकता लागलेली असते. नासा आणि इस्रोकडून आकाशाबद्दल सतत काही ना काही नवीन माहिती समोर आणली जाते.
गेल्या काही दिवसांपूर्वी आकाशामध्ये सलग तीन तारे एका रांगेत दिसले होते. त्याची चर्चा सर्वत्र होत होती. 28 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच शुक्रवारीही प्रयागराजसह उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये सूर्याभोवती वर्तुळाकार दिसला. त्यानंतर, सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले होते. सूर्याभोवती दिसलेल्या वर्तुळाकाराचा फोटो अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.
अनेकांना सूर्याभोवती पडलेल्या या गोल वर्तुळाकाराबाबत अनेक प्रश्न पडले होते. हे सूर्याभोवती कशामुळे पडते? आणि या काय म्हणतात? असे प्रश्न पडले होते. चला तर जाणून घेऊया….
विज्ञानाच्या भाषेत याला सोलर हॅलो किंवा सन रिंग असेही म्हणतात. वातावरणात असलेल्या षटकोनी क्रिस्टलमुळे असे घडले आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वातावरणातील सूर्यप्रकाश बर्फाच्या स्फटिकांशी संवाद साधतो तेव्हा ते अपवर्तन होते.
प्रकाशाच्या या झुकण्यामुळे सूर्याची किरणे अनेक रंगांमध्ये विभक्त होतात, ज्यामुळे सन हॅलो नावाचा स्पेक्ट्रम तयार होतो. या वर्तुळात अनेक वेळा इंद्रधनुष्यासारखे अनेक रंगही दिसतात. सूर्य प्रभामंडलाला 22-डिग्री-रिंग हॅलो देखील म्हणतात.
सूर्याभोवती गोल वर्तुळाकार दिसण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. तर याअगोदरही 20 फेब्रुवारी 2016 रोजी शुक्रवारी चंद्राभोवती गोल वर्तुळाकार दिसले होते. तसेच 20 जुलै 2015 रोजी रविवारी उत्तराखंडच्या बेतालघाट येथील हल्दवानी येथेही असेच सूर्याभोवती गोल वर्तुळाकार कडे दिसले होते.