मुलींशी व्हॉट्सॲपवर बोलताना काय काळजी घ्यावी?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुलगी जर रिप्लाय देत नसेल तर, सारखे किंवा दररोज मेसेज तिला करू नयेत. याचा त्या मुलीला मानसिक त्रास होतो.

तुम्हाला जर राग आला असेल तर शक्यतो, व्हाट्सएपच्या मेसेज राग काढू नका, रागाच्या भरात मोठे मेसेज लिहिता ही येतं नाहीत किंवा असे मेसेज वाचून समोरच्याचा तुमच्या बद्दल गैरसमज होतो.

तुम्ही व्हाट्सएप वर जे काही चॅटिंग करतं आहात, त्याचा स्क्रीन शॉट काढला जाऊ शकतो, तो स्क्रीन शॉट तुमच्या विरोधात वापरला जाऊ शकतो.

तुम्हाला राग आला आणि जरी मुलीची चुकी असेल तरी व्हाट्सएप वर चॅटिंग करताना शिव्या देऊ नका. तुमचा मुद्दा किती ही बरोबर असला तरी तुमची शिवराळ भाषा तुमच्या विरोधात वापरली जाऊ शकते

गर्लफ्रेंड नसेल तर, त्या मुलीला किसिंग स्मायलीज पाठवू नका. टायगर श्रॉफ सारखी तुमची बॉडी असली तरी, स्वतःचे उघडेबंब चड्डीतले फोटो पाठवू नका.

तुमचं प्रेम कितीही खरं, खूप आणि पवित्र असलं तरी तुमच्या गर्लफ्रेंडला कधीच तिचे न्यूड फोटो मागू नका.

कुठल्याच मुलीला हॉट, सेक्सी फोटो मागू नका. सेक्स चॅट करत असाल, तर त्याचाही स्क्रीनशॉट काढला जाऊ शकतो, कायम स्वरूपी तो तुमच्या विरोधात वापरला जाऊ शकतो.

कोणा तिसऱ्या व्यक्तीला नावं ठेवतं असाल, तर ज्याला नावं ठेवतं आहात, त्या व्यक्तीपर्यंत तुमचं हे संभाषण जाऊ शकतं.

चार ओळींपेक्षा जास्त काही बोलायचं, तर सरळ फोन करून तसं सांगा, व्हाट्सएप वर मोठे मेसेज वाचून गोंधळ किंवा गैरसमज सुद्धा होऊ शकतो. जर मुलगी “नाही, नको” म्हणाली तर ‘ओके’ म्हणून संभाषण किंवा तो विषय तिथेच संपवा,

“प्लिज, प्लिज” करत फोर्स करू नका. मुलीचा प्रत्येक डीपी, स्टेटस बघून त्यावर प्रतिक्रिया द्यायची काही गरज नसते, यावरून तुम्ही रिकामटेकडे आहात असा समज होतो.

संभाषण करताना वाद झाला, पुरुषी अहंकार दुखावला गेला तरी, “आता हिला काहीही बोलतो, करू दे ब्लॉक” असा विचार करून तिला काहीही बोलू ही नका

तुम्ही जर तुमचं सिक्रेट व्हाट्सएप वर सांगत असाल तर त्या सिक्रेटला शब्दांचं स्वरूप येतं, ते स्क्रीन शॉट स्वरूपात त्या मुलीकडे कायम स्वरूपी राहतं.

अहमदनगर लाईव्ह 24