अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं भूमीपूजन आणि पायाभरणी समारंभ पार पडणार आहे.
विविध राजकीय पक्षांचे नेते, केंद्रीय मंत्री आणि वेगवेगळ्या देशांचे राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. या नव्या संसद भवनात देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त अधिवेशन आयोजित करता यावा यासाठी ऑक्टोबर 2022 पर्यंत इमारतीचं बांधकाम पूर्ण करण्याची सरकारची तयारी आहे.
नवीन संसद भवनात लोकसभेचा आकार आता असलेल्या सभागृहाच्या तुलनेने तीन पटीने जास्त आहे. इतकंच नाही तर राज्यसभेचा आकारही मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे.
ही आहेत नव्या संसदभवनाची वैशिष्ट्ये
सर्व आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज अशी ही इमारत असणार आहे. याच्या बांधकामादरम्यान संसदेच्या कामकाजात कमीत कमी अडथळे येतील आणि पर्यावऱणाला हानी पोचणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
नव्या संसद भवनाच्या लोकसभा कक्षात ८८८ जणांच्या बसण्याची सोय असेल. संयुक्त अधिवेशनात १२२४ खासदारांच्या एकत्र आसनव्यवस्थेची सोय असणार आहे. तर राज्यसभेत ३८४ जणांच्या बसण्याची सोय करण्यात येणार आहे.
६४ हजार ५०० चौरस मीटरच्या क्षेत्रात ही नवी संसद भवनाची इमारत उभी राहणार आहे. या इमारतीसाठी साधारण ९७१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. २०२२ पर्यंत याचे बांधकाम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com