Asaram Successor : आसाराम बापूच्या संपत्तीची वारसदार असणारी महिला कोण? जी सांभाळतेय 10 हजार कोटींची संपत्ती

आसाराम बापू यांना बलात्कार प्रकरणी नुकतीच गुजरात न्यायालायने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र आसाराम बापू यांनी हजारो कोटींची कमावलेल्या संपत्तीची वारसदार महिला कोण आहे याबद्दल जाणून घ्या...

Asaram Successor : आसाराम बापू याच्या दरबारात काही दिवसांपूर्वी लाखो लोक येत असत. मात्र आता आसाराम बापू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आसाराम बापू यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत त्यांना नुकतीच शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

81 वर्षीय आसाराम बापूला गुजरात न्यायालायने सुरतच्या एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आसाराम बापू गेल्या काही वर्षांपासून जेलमध्येच आहे. नुकतेच त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत.

जोधपूर न्यायालयाने एप्रिल 2018 मध्येच आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तेव्हापासून आसाराम बापू जोधपूर तुरुंगात बंद आहे. त्यांचा मुलगा नारायण साईही जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

Advertisement

आसाराम बापू यांची संपत्ती ही हजारो कोटींची आहे. सुमारे 4 दशकात आसारामने ही संपत्ती कमवली आहे. ही संपत्ती 1 किंवा 2 हजार कोटींची नाही तर 10 हजार कोटींची आहे. ही संपत्ती कोण सांभाळत आहे याबद्दल जाणून घेऊया…

आसारामचा वारस कोण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आसारामचा वारस दुसरा कोणी नसून त्यांची मुलगी आहे. आसाराम यांच्या मुलीचे नाव भारती देवी आहे. भारतीदेवींना लोक ‘श्रीजी’ आणि ‘भारतीश्री’ म्हणतात. ‘संत श्री आसाराम ट्रस्ट’ची स्थापना अनेक वर्षांपूर्वी झाली होती.

Advertisement

त्याचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात येथे आहे. भारती देवी आसारामच्या ट्रस्टच्या भारतातील आणि परदेशातील सर्व आश्रमांचे व्यवस्थापन करतात. मात्र, तिचे वडील आणि भावाप्रमाणे ती लाइमलाइटपासून दूर राहते. आसारामच्या अनुयायांमध्ये भारतीदेवींची प्रतिमा चांगली आहे.

भारती देवी या कधी प्रसिद्धी झोतात आल्या?

आसाराम बापू यांची मुलगी भारती देवी या आसाराम बापू यांच्या आध्यात्मिक व्यासपीठावर 2004 साली दाखल झाल्या होत्या. या आगोदर आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साई आसाराम बापू यांचा वारसदार होता.

Advertisement

भारती देवी लाइमलाइटपासून दूर राहतात

आसाराम आणि नारायण साई यांची नावे चर्चेत राहिल्यामुळे बाहेरच्या जगात भारती देवीची कमी चर्चा होते. कारागृहात असूनही आसारामचे देशात आणि जगात मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत.

भारती देवी यांचा जन्म 15 डिसेंबर 1975 रोजी झाला होता. त्यांनी लहान वयातच दीक्षा घेतली होती. भारती देवी यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केल्याचा दावा केला जात आहे. ती बऱ्याच दिवसांपासून आसारामचे आश्रम सांभाळत आहे.

Advertisement