Dead People Clothes : मनुष्याच्या जन्माअगोदरच त्याचा मृत्यू ठरलेला असतो. त्यामुळे सर्व सजीव प्राण्यांचा एक ना एक दिवस मृत्यू नक्की होणार असतो. पण कोणाचाही मृत्यू झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या अनेक वस्तू पाठीमागे राहतात. मग या वास्तूचे काय केले पाहिजे. त्या वापरल्या पाहिजेत की नाही? याबद्दल अनेकांना शंका असते.
मनुष्याच्या मृत्यूनंतर अनेकजण त्याचे कपडे किंवा इतर गोष्टी वापरत असतात. पण त्याची कपडे वापराने खरंच चांगले आहे का? जर तुम्ही मृत व्यक्तीची कपडे वापरत असाल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. याबद्दल जाणून घेऊया…
पुनर्जन्म
हिंदू धर्मात पुनर्जन्म होतो असे अनेकवेळा सांगितले जाते. जेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडतो तेव्हा तो दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. पण आत्मा हा शरीरापासून मुक्त झाला तरच तो दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकतो. जर मृत व्यक्ती कुटुंबाशी असलेल्या मोहातून मुक्त होऊ शकला नाही तर त्याचा आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकणार नाही.
सद्गुरु जग्गी वासुदेव
सद्गुरु जग्गी वासुदेव म्हणतात “मृत्यू…. ही एक अतिशय संथ प्रक्रिया आहे, ज्याप्रमाणे जन्म एका क्षणात होत नाही, त्याचप्रमाणे गर्भात असलेल्या गर्भाला या जगात येण्यासाठी बराच वेळ थांबावे लागते.
वैद्यकीयदृष्ट्या मृत व्यक्तीही त्याच क्षणी आपले जीवन सोडत नाही, परंतु त्याच्या शरीरात अजूनही काही श्वास शिल्लक असतो… तो कदाचित अजूनही जन्म आणि मृत्यूच्या चक्रात लढत असतो.
तो अजूनही मृत्यूला हरवण्याचा प्रयत्न करत असेल.. पण जीवनाच्या या लढाईत पराभूत झाल्यावर, आत्मा शरीर सोडून गेला की, कुटुंबातील सदस्यांना त्या शरीराला जोडलेले कपडे आणि इतर जवळचे सामान मिळते. वस्तू एकतर जाळल्या पाहिजेत किंवा दान केल्या पाहिजेत.
सद्गुरु काय म्हणतात
मृत व्यक्तीची कपडे कधीही वापरू नयेत. कारण जर तुम्ही त्या व्यक्तीची कपडे वापरली तर आत्मा कधीच मुक्त होऊ शकत नाही. आत्मा हा पृथ्वी सोडत असतो. मात्र जर तुम्ही त्याची कपडे वापरत असाल तर त्याचा आत्मा कधीही मुक्त होऊ शकत नाही.
जन्म आणि मृत्यू
मनुष्याचा जन्म आणि मृत्यूच्या तारखा ठरलेल्या असतात असे अनेकदा तुम्ही ऐकले असेल. जन्म झाल्यानंतर मृत्यू हा अटळ असतो. त्यामुळे पृथ्वीवर जन्म घेतलेला प्रत्येक सजीव जीवाचा मृत्यू हा होणारच असतो. काही वेळा आत्मा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा शरीर मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अग्निवेळी मृत व्यक्तीची सर्व कपडे जाळून टाकावीत.
आत्मा शरीराशी जोडलेला असतो
मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आत्मा त्याच्या शरीराशी जोडलेला असतो. कारण मृत व्यक्तीला त्याच्या शरीरावर खूप प्रेम असते. जसे कपडे,पेन,कोणत्याही महागड्या वस्तू. या सर्व वस्तू कधीही कोणीही वापरू नये. जर अशा वस्तू तुम्ही वापरल्या तर आत्म्याच्या मार्गात अढथळा निर्माण होऊ शकतो. मृत व्यक्तीच्या वस्तू गरिबांना दान करणे हा एक चांगला पर्याय आहे.
व्यावहारिक विचारधारा
मृत्यूच्या काही काळापूर्वी माणसाची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. एवढेच नाही तर एखाद्या आजाराने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरी त्या कपड्यांमध्ये बॅक्टेरिया किंवा सूक्ष्म जीव उरले असण्याची शक्यता आहे, जे उघड्या डोळ्यांनी पाहणे जवळजवळ अशक्य आहे. जो व्यक्ती ते कपडे घालतो, त्याच्या शरीरात हे जीवाणू पोहोचण्याची शक्यता असते, त्यामुळे मृत व्यक्तीचे कपडे पुन्हा वापरू नयेत हे अगदी योग्य आहे.
गरिबांना दान करा
जेव्हा कोणाचाही कुटुंबामध्ये मृत्यू होईल अशा व्यक्तीची कपडे आणि इतर वस्तू गरीब लोकांना दान करणे हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही असे केले तर मृत आत्म्याला शांती लाभेल आणि आत्मा शरीरातून मुक्त होईल.