Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Xiaomi 12 Pro 5G Offers : स्वस्तात खरेदी करा Xiaomi 12 Pro 5G! मिळतेय तब्बल 30 हजार रुपयांची सूट, त्वरित घ्या संधीचा फायदा

तुम्हालाही 5G स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण Xiaomi 12 Pro 5G वर तब्बल ३० हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

Xiaomi 12 Pro 5G Offers : तुम्हीही नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट कडून Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोनवर हजारोंची सूट दिली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट कडून सतत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर सूट दिली जाते. त्यामुळे ग्राहकांची हजारो रुपयांची बचत होत असते. या अशा ऑफर्समुळे अनेक ग्राहक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मकडे आकर्षित होत असतात.

Xiaomi 12 Pro 5G या स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिएंट असलेल्या मॉडेलवर फ्लिपकार्टकडून मोठी सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत.

Xiaomi 12 Pro 5G किंमत आणि ऑफर

Xiaomi 12 Pro 5G 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची कमीत बाजारात 79,999 रुपये आहे. पण फ्लिपकार्ट कंपनीकडून या स्मार्टफोनवर ४१ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन खरेदी करण्यावर ३० हजार रुपयांची बचत होत आहे.

जर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर 79,999 रुपयांचा स्मार्टफोन फक्त 46,480 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या 5G स्मार्टफोनवर 33,519 रुपयांची मोठी सूट दिली जात आहे.

बँक ऑफर

जर तुम्हाला आणखी कमी किमतीमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर त्यावर बँक ऑफर देखील दिली जात आहे. Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.

Xiaomi 12 Pro 5G तपशील

Xiaomi 12 Pro 5G मध्ये 6.73 इंच फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे, जो 3200×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. यात Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेटचा सपोर्ट आहे. हा फोन Android 12 OS वर चालतो.

फोनमध्ये 50MP + 50MP + 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 120W हायपरचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,600mAh बॅटरी आहे.

उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये मिळत असल्याने ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. तसेच कमी बजेटमध्ये 5G स्मार्टफोन देखील मिळत आहे. फ्लिपकार्टच्या ही ऑफर काही काळापुरतीच मर्यादित असेल.