Categories: भारत

‘या’ अभिनेत्याला पत्नीची घटस्फोटाची नोटीस!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठविली. यासह आलिया सिद्दीकीने नवाजच्या कुटुंबीयांवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

आलिया म्हणाली, २००३ पासून ती नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखते. एकत्र राहू लागल्यानंतर नवाजचा भाऊ शामसही आमच्याबरोबर राहायचा. मग, हळूहळू आम्ही प्रेमात पडलो.

आम्ही लग्न केलं. सुरुवातीपासूनच आमच्यामध्ये काही समस्या होत्या. मला वाटले, की हे थांबेल. मात्र १५ ते १६ वर्षांनंतरही अत्याचार थांबले नाहीत.

जेव्हा आम्ही एकमेकांना ‘डेट’ करत होतो आणि लग्न करणार होतो, तेव्हा मला ते चांगले आठवते, तो आधीपासूनच रिलेशनशीपमध्ये होता.

आम्ही लग्नाआधी आणि नंतर खूप भांडत होतो. मी जेव्हा गर्भवती होते, तेव्हा मी डॉक्टरकडे चेकअपसाठी स्वत: गाडी चालवत जायचे.

जेव्हा माझे लेबर पेन सुरु झाले, तेव्हा नवाज त्याच्या आई-वडिलांच्या इथे होता. पण जेव्हा मला त्रास होत होता, तेव्हा माझे पती माझ्याबरोबर नव्हते. ते गर्लफ्रेंडशी फोनवर बोलत असायचे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24