भारत

Yamaha MT125 Superbike : KTM ला टक्कर देणार यामाहाची ही सुपर बाईक! बाईकचा शानदार लूक समोर; जाणून घ्या फीचर्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Yamaha MT125 Superbike : स्पोर्ट बाईक प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता KTM ला टक्कर देण्यासाठी यामाहा आता एक सुपर बाईक लॉन्च करणार आहे. त्यामुळे बाईक प्रेमींना आता आणखी एक स्पोर्ट बाईक खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे.

Yamaha कंपनी आता एक सुपर स्पोर्ट बाईक बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. जी लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉन्च केली जाणार आहे. तसेच भारतीय बाजारपेठेत देखील लवकरच ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

स्पोर्ट बाईक म्हणलं की अनेकांना KTM कंपनीच्या बाईक आठवतात. तसेच या कंपनीच्या अनेक बाईक भारतीय तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. केटीएम ड्यूक या बाईकला टक्कर देण्यासाठी यामाहा कंपनीने Yamaha MT125 बाईकची निर्मिती केली आहे.

Yamaha MT125 सुपर बाईकची रचना अप्रतिम असेल

यामाहा कंपनीकडून Yamaha MT125 बाईकची डिझाईन जबरदस्त बनवण्यात आली आहे. उत्तम डिझाईन आणि उत्कृष्ट फीचर्स सह ही बाईक भारतामध्ये लॉन्च केली जाणार आहे.

यामाहा बाईकमध्ये तुम्हाला विंडस्क्रीन देखील पाहायला मिळेल. जर तुम्ही या बाईकचे स्पेशल एडिशन विकत घेतले तर तुम्हाला निळ्या रंगाची बाईक मिळेल. अ‍ॅडजस्टेबल लिव्हरची सुविधाही रंगात दिसत आहे

वैशिष्ट्ये

या बाईकमध्ये कार्बन फायबर सोबत अॅल्युमिनियम क्रॅंक केस कव्हर, रियर फेंडर एलिमिनेटर किट, सुरक्षेसाठी फुल सिस्टम अॅक्रोफोबिक एक्झॉस्ट देखील देण्यात आले आहे.

या बाईकमध्ये तुम्हाला अनेक रंगांचे पर्याय पाहायला मिळतील आणि तुम्हाला TFT इन्स्ट्रुमेंट मिळेल. ट्रॅक्शन कंट्रोल. सिस्टीम सारखी आधुनिक वैशिष्ट्ये देखील पाहिली जातील. यामाहाने ही बाईक युजर्सना लक्षात घेऊन बनवली आहे जेणेकरून बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला कोणतीही अडचण येऊ नये अशी दमदार फीचर्स या बाईकमध्ये देण्यात आली आहेत..

KTM सारख्या मोठ्या कंपन्यांना स्पर्धा देईल

यामाहा कंपनीकडून KTM सारख्या स्पोर्ट बाईकला टक्कर देण्यासाठी ही बाईक तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच KTM Duke, Kawasaki Z125, Suzuki GSX125, Honda CB125 यांसारख्या मोठ्या स्पोर्ट बाईकला ही बाईक टक्कर देईल.

कंपनीकडून या बाईकच्या किमतीबद्दल अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या बाईकचा लूक समोर आला आहे. बाईक पाहताच ग्राहकांना पसंत पडेल असे मॉडेल यामाहा कंपनीकडून सादर करण्यात आलेत आहे.

Ahmednagarlive24 Office