मुकेश अंबानी सुद्धा गरीब झालेत … जाणून घ्या असं काय झालं कि…आले वाईट दिवस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सला एका दिवसात थोड्या थोडक्या नाही ७ बिलियन डॉलर्सचा फटका बसला आहे. करोना काळातही रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स तेजीत होते.

मात्र सोमवारी रिलायन्सचे शेअर्स ८.६ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे रिलायन्सला एका दिवसात ७ बिलियन डॉलर्सचा तोटा झाला आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या अहवालानुसार गेल्या सात महिन्यातली ही सगळ्यात मोठी घसरण आहे. लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची तीन स्थानांनी घसरण झाली असून ते आता नवव्या स्थानावर पोहोचले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या(reliance industries) शेअरमध्ये सोमवारी मोठी घसरण झाल्याने दिग्गज उद्योगपतींच्या स्थानात हा बदल पाहायला मिळाला. कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाही दरम्यान शुद्ध लाभाच्या वार्षिक आधारावर १५ टक्के कमतरतेसह ९,५७० कोटी रूपयांवर राहण्याची सूचना दिली होती.

यानंतर सोमवारी कंपनीचे सेअर ८.५ टक्क्यांहून अधिक घसरले. रिलायन्स ऑईलला रिफायनिगं बिझनेसमध्ये झालेल्या नुकसानामुळे कंपनीच्या शुद्ध नफ्यात सगळ्यात जास्त घट पाहायला मिळाली. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ६.८ अब्ज डॉलर(म्हणजेच तब्बल ५० हजार कोटी रूपये) इतकी घट झाली. त्यामुळेच त्यांची यादीत घसरण झाली.

याआधी सप्टेंबरमध्ये आलेल्या हुरूनच्या श्रीमंतांच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांनी लॉकडाऊननंतर दर तासाला ९० कोटी रूपये कमावले आहेत. पेट्रोलियमपासून ते रिटेलपर्यंतच्या त्यांच्या बिझनेसमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते जगातील टॉप १० श्रीमंतांपैकी एक आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखी नुकत्याच महिन्यांमध्ये रिलायजन्स इंडस्ट्रीजमध्ये १.८लाख कोटींची गुंतवणूक झाली. RILच्या शेअरर्समध्ये जबरदस्त घसरण झाल्याने ही घट पाहायला मिळाली. यानंतर मुकेश अंबानी यांची संपत्ती ६.९ अब्ज डॉलरने कमी झाली. यासोबतच अंबानी ७१.३ अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह फोर्ब्सच्या धनकुबेरांच्या यादीत घसरून नवव्या स्थानावर पोहोचले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24