Friendship Days Special:- पावसाळ्याचा कालावधी जसा फिरण्यासाठी उत्तम असतो तसंच काही स्पेशल दिवस असतात जे कायम स्मरणात राहावेत याकरिता आपण काहीतरी वेगवेगळ्या प्लॅनिंग करत असतो. अशा प्लॅनिंगमध्ये प्रामुख्याने कुठेतरी फिरायला जाणे आणि त्या ठिकाणची आठवण आपल्या कायम स्मरणात राहील अशा पद्धतीचा आपला प्लॅनिंग असतो.
स्पेशल दिवस काहीतरी गोष्टींनी स्पेशल किंवा खास बनवणे हे खूप महत्त्वाचे असतात. अगदी याच पद्धतीने जर आपण मित्र किंवा मैत्रीचे नाते जर पाहिले तर ते एक खूप महत्त्वाचे नाते असते व मित्र किंवा मैत्रिणी आनंदाने सुखदुःखामध्ये आपल्या सोबत असणारे एक भक्कम अशा सवंगडी असतात.
मैत्रीच्या नात्याला जपणारे आणि हक्काने एकमेकांशी भांडू शकणारे असे हे मैत्रीचे नाते असते. त्यामुळे चार ऑगस्टला येणारा फ्रेंडशिप डे पूर्ण भारतामध्ये एक उत्साहाने साजरा केला जातो आणि मैत्रीचा दिवस म्हणून या दिवसाचे महत्त्व देखील अनन्यसाधारण आहे.
येणारा फ्रेंडशिप डे हा कायम स्मरणात राहावा याकरिता मित्र-मैत्रिणी अनेक प्रकारचे प्लॅनिंग करतात व यामध्ये कुठे जेवायला जाणे, हॉटेलिंग किंवा मस्तपैकी कुठे ट्रिप आयोजित करणे अशा प्रकारच्या प्लॅनिंग यामध्ये असतात.
त्यामुळे येणाऱ्या चार ऑगस्टला तुमचा देखील फ्रेंडशिप डे ला कुठे बाहेर जायचा प्लान असेल तर तुम्ही भारतातील काही महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात व तुमचा फ्रेंडशिप डे खास बनवू शकतात.
या पर्यटन स्थळांना भेट द्या आणि यावर्षीचा फ्रेंडशिप डे अविस्मरणीय बनवा
1- उदयपूर– राजस्थान राज्यामध्ये अनेक अशी लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत व काही शहरे देखील वैशिष्ट्यपूर्ण अशी आहेत. या सगळ्यांमध्ये राजस्थानमधील उदयपूर या शहराने आपले स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केलेली आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून उदयपूर हे जगात प्रसिद्ध असून त्याला तलावाचे शहर म्हणून देखील ओळखले जाते.
त्यामुळे तुम्ही या फ्रेंडशिप डे ला उदयपूर जाण्याचा प्लान करू शकता. ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणचे वातावरण खूपच मनाला मोहून टाकणारे व आल्हाददायक असते. या ठिकाणी असणारा ऐतिहासिक महल तसेच हवेलींना तुम्ही भेट देऊ शकतात.
2-महाबळेश्वर– महाराष्ट्रामध्ये जे काही प्रसिद्ध अशी पर्यटन ठिकाणी आहे त्यापैकी महाबळेश्वर एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. तसेच एक सुंदर हिल स्टेशन म्हणून देखील महाबळेश्वरची ओळख आहे.
त्यामुळे तुम्ही या फ्रेंडशिप डे ला तुमच्या मित्रांसोबत महाबळेश्वर जाण्याचा प्लानिंग करू शकतात व मस्त टाइम स्पेंट करू शकतो. या ठिकाणी तुम्ही निसर्गाचे सौंदर्य तसेच धबधबे व स्ट्रॉबेरीची शेती तसेच अनेक मंदिरे पाहू शकता.
3- हम्पी– हम्पी हे कर्नाटक राज्यातील ठिकाण असून ते पर्यटनासाठी प्रसिद्ध असून जागतिक वारसा स्थळांमध्ये देखील हंपीचा समावेश करण्यात आला आहे.
या ठिकाणी प्राचीन मंदिरे असून तुम्हाला वास्तू कलेचा अतिउत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळतो. याशिवाय या ठिकाणी अनेक प्रेक्षणीय अशी स्थळे आहेत.
4- कुर्ग– हे कर्नाटक मधील एक महत्त्वाचे ठिकाण असून भारताचे स्कॉटलंड म्हणून याला ओळखले जाते. कुर्ग हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून लोकप्रिय ठिकाण आहेच संपूर्ण जगामध्ये देखील प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी जर तुम्ही ऑगस्टमध्ये फिरायला गेलात तर या ठिकाणचे वातावरण अतिशय मनाला मोहून टाकणारे व अल्हाददायक असते. या ठिकाणी तुम्हाला पर्वतीय प्रदेश तसेच धबधबे पाहायला मिळतात व सर्वीकडे कॉफीच्या मळ्यांनी समृद्ध हा परिसर आहे.