अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- हरियाणातील आपच्या नेत्याच्या पत्नीने इच्छामरणाची मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.आपचा नेता हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील राहणार असून त्याचे नाव हंसराज सीमा आहे.
त्याची पत्नी बिमल देवी यांनी उपायुक्तांना पत्र लिहिले आहे.या पात्रातून त्यांनी सिरसा येथील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
पोलिसांवर आरोप करताना कमला देवी म्हणतात की,पोलिसांनी त्यांचे पती हंसराज सामा,दोन मुलगे आणि सुना यांना कलाम ३२६ अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली आहे.
या प्रकरणी उच्चस्तरीय आणि निष्पक्ष पद्धतीने तपस करण्यात यावा, अशी मागणी बिमला देवी यांनी केली आहे.त्यांनी पात्रात लिहिले आहे की,गेल्या २८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या जवळच्या एफसीआयच्या गोदामात त्यांचे आणि शेजाऱ्यांचे भांडण झाले.
या भांडणात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र असे होऊनही पोलिसांनी हंसराज सामा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिमला देवी यांच्या म्हणण्यानुसार भांडणाच्या वेळी तिथे बाकीचे लोक पण उपस्थित होते.
त्यांनी यासंदर्भात लिखित शपथपत्र पण दिले आहे.कुठल्याही शेजाऱ्याला दुखापत झाली नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
आता या प्रकरणातील तपास निष्पक्षपणे व्हावा आणि आपल्याला आपल्या मुलांसहित इच्छामृत्यू देण्यात या अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे.