‘टिकटॉक’वर लाइक न मिळाल्याने तरुणाची गळफास घेत आत्महत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नोएडा :  ‘टिकटॉक’ या व्हिडिओ शेअरिंग ॲपमुळे देशात एका तरुणाचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना नोएडामध्ये घडली. व्हिडिओला लाइक्स मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली.

नोएडाच्या सलारपूर गावातील चांद मशिदीजवळ राहणाऱ्या इकबाल नामक १८ वर्षीय तरुणाने गुरुवारी रात्री हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, इकबाल नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड करीत असे. मात्र, गत काही दिवसांपासून त्याच्या व्हिडिओला लाइक्स मिळत नव्हत्या.

यामुळे इकबाल निराश होता. या नैराश्यातूनच त्याने गुरुवारी मध्यरात्री घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

आत्महत्येचे वृत्त कळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली. इकबालने टिकटॉक व्हिडिओला लाइक मिळत नसल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24