अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Integrated Farming : भारत एक शेतीप्रधान देश (Agricultural Country) आहे यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers Income) दुप्पट करण्यासाठी मायबाप सरकार शासन स्तरावर नेहमीच प्रयत्न करत असते.

शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीऐवजी एकात्मिक शेती तंत्राचा (Integrated farming techniques) वापर केल्यास त्यांचे उत्पन्न आठ ते दहा पटीने वाढू शकते.

बिहार राज्यातील (Bihar) औरंगाबाद जिल्ह्याच्या दौडनगर ब्लॉकच्या बेलाडी गावचे शेतकरी संजय कुमार सिंह यांनी हे सिद्ध केले आहे. दोन एकर एकात्मिक शेती करत संजय यांनी लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे.

एकात्मिक पद्धतीने शेती करून संजय वर्षाकाठी चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळवत आहेत. संजय यांच्या मते, एकाच जमिनीवर भात आणि गहू अशी दोन पिके घेतली तर वर्षभरात 25 ते 30 हजार रुपयेच उत्पन्न मिळू शकते.

यावरून असे समजू शकते की एकात्मिक शेती करून शेतकरी आपले उत्पन्न आठ ते दहा पटीने वाढवू शकतो. गरज आहे ती शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक विचार सोडून आधुनिक पद्धतीने (Modern Technique) शेती करण्याची.

एकात्मिक पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो मात्र असे असले तरीही एकात्मिक शेती करण्यास शेतकरी नाखूष असल्याचे संजय यांनी सांगितले. शेतकरी बांधव एकात्मिक शेतीत जोखीम असल्याचे सांगत बाजूला सरकतात मात्र खरं पाहता एकात्मिक शेतीमध्ये कोणतेही जोखीम नाही.

त्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, या शेतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पिकातून उत्पन्न मिळते. कोणत्याही एका पिकात नुकसान झाल्यास दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पिकातून त्या पिकाची भरपाई काढली जाऊ शकते.

यामुळे संजय यांनी यावेळी शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती करावी असा अनमोल सल्ला इतर शेतकऱ्यांना दिला. संजय यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास त्यांना कधीही नुकसान सहन करावे लागणार नाही. संजय आगामी काही दिवसात दोन एकर ऐवजी तीन एकरात एकात्मिक शेती करण्याचे ध्येय ठेवून काम करत आहेत.

संजय यांनी अर्ध्या बिघ्यापेक्षा कमी शेत जमिनीत पपईची लागवड करून दिवसाला 1500 ते 3000 रुपये कमावण्याची किमयाही साधली आहे.

संजय सांगतो की, त्यांनी वैशाली येथून पपईचे एक रोप आणले होते त्या रोपाची त्यांनी लागवड केली. त्याला पाच देठ होते. यामुळे मात्र या एका झाडापासून एका वर्षात पाच क्विंटल पपई उत्पादन संजय यांना मिळाले. म्हणजेच अवघ्या एका रोपातून 15 हजार रुपयांची पपई संजय यांनी विकली आहे.

या झाडासोबत जिल्हा कृषी अधिकारी यांनी देखील फोटो काढला असल्याचे संजय यांनी सांगितले. याशिवाय संजय यांच्या शेतात एक असे पपईचे झाड आहे ज्याला तीन देठ आहेत आणि तिन्ही देठांना फळे येतात. या पपईच्या रोपापासून सहा ते सात महिन्यांत उत्पादन सुरू होते, असे त्यांनी सांगितले.

आता संजय यांनी अर्ध्या बिघ्यामध्ये पपईची लागवड केली असून ते दररोज 50 ते 100 किलो पपई थेट बाजारात विकत आहेत. यामुळे त्यांना दररोज 1500 ते 3000 रुपयांचे रोख उत्पन्न मिळत आहे.

एक एकरात पपईची लागवड करून अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी यावेळी नमूद केले. यामुळे ते इतर शेतकऱ्यांना पपई लागवड करण्याचा सल्ला देतात. संजय यांच्या प्रत्येक पपईच्या झाडापासून 50 ते 100 किलो पपई काढली जात आहे.

संजय सांगतात की, पपईच्या शेतीत श्रम कमी लागते पण फळांची जास्त काळजी घ्यावी लागते. फळ शोषणाऱ्या किडीसाठी औषध वापरावे लागते.

असे म्हटले जाते की फळ खराब होऊ नये, त्याची चमक, चव आणि गोडपणा वाढवण्यासाठी, उष्णतेमध्ये, फळाला गोणीने झाकून ठेवावे.

निश्चितच संजय यांनी एकात्मिक पद्धतीने केलेली शेती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली आहे. एकात्मिक शेतीत त्यांनी केलेला या कार्याचा गौरव देखील करण्यात आला असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.