iPhone 14 Pre Order : आयफोन चाहते (iPhone fans) बऱ्याच दिवसांपासून त्यांचा आवडता स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च (Launch) होण्याची वाट पाहत आहेत. अशा वेळी याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

चार मॉडेल्ससह लॉन्च होणार्‍या या सीरिजची लॉन्च डेट (iPhone 14 Launch Date) काय असेल, याचा अधिकृत खुलासा करण्यात आला आहे आणि सध्या तरी Apple कडून या सीरीजबद्दल एवढीच माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्समध्ये या सीरिजच्या प्री ऑर्डरची तारीख (Date of pre order) आणि सेल डेटबद्दलही माहिती देण्यात आली आहे.

iPhone 14 लाँचची तारीख

Apple ने पुष्टी केली आहे की आयफोन 14 सीरीज या महिन्यात लॉन्च होत आहे. ही स्मार्टफोन सीरीज 7 सप्टेंबर 2022 ला लॉन्च होत आहे. लॉन्च इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग तपशील (Live streaming details) देखील उघड झाले आहेत.

बातम्यांनुसार, या सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे चार मॉडेल सादर केले जाऊ शकतात.

iPhone 14 प्री ऑर्डर

आता या सीरिजचे फोन कधी आणि कसे प्री-ऑर्डर केले जाऊ शकतात ते जाणून घेऊ. मीडिया रिपोर्ट्सनुसार 7 सप्टेंबर 2022 ला लॉन्च झाल्यानंतर हा स्मार्टफोन 9 सप्टेंबर 2022 रोजी प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध केला जाऊ शकतो.

हा स्मार्टफोन सीरीज 16 सप्टेंबर 2022 रोजी सेलसाठी सादर केला जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात येत आहे की Apple च्या रिटेल स्टोअरच्या स्टाफला देखील सांगण्यात आले आहे की या तारखेला ‘मोठे नवीन उत्पादन रिलीज’ होऊ शकते, त्यामुळे त्यांनी तयार राहावे. हा फोन भारतात कधी प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो याबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही.