file photo

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Ahmednagar News :- सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. यात अनेकजण सट्टा लावतात. पाथर्डी शहरातील जुन्या पंचायत समिती जवळ पत्र्याच्या शेडमध्ये आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या तिघांना
पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. सुरज शामराव दहिवाले , संकेत सुधीर पवार, दिपक भिमाजी सानप अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पाथर्डी शहरातील जुनी पंचायत समीतीचे जवळ, पञ्याचे शेडमधे काही इसम आय.पी.एल. क्रिकेट सामन्यावर पैसे लावुन जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, दिल्ली कॅपीटल विरुद्ध गुजरात या क्रिकेटच्या सामन्यावर बोली लावुन फोनवरुन क्रिकेटचा सट्टा लावत होते. या कारवाईत मोबाईल फोन,एल एडी टिव्ही व इतर वस्तू असा एकूण १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.