IPO Benefits :  तुम्ही मार्केटमध्ये अनेकदा ऐकले असेल कि ही XYZ कंपनी आपला IPO आणणार आहे. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून मालामाल होऊ शकतात. मात्र हा IPO म्हणजे काय ? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का ? नाहीना आज आम्ही तुम्हाला नेमकं IPO म्हणजे काय आणि त्याचा फायदा कसा होते याची माहिती देणार आहोत.

जेव्हा जेव्हा एखादी कंपनी प्रथमच आपले शेअर बाजारात आणते तेव्हा या प्रक्रियेला IPO म्हणजेच Initial Public Offering म्हणतात. या प्रक्रियेत गुंतवणूकदार थेट कंपनीकडून शेअर्स खरेदी करतात. त्यानंतर हे शेअर बाजारात येतात जिथे गुंतवणूकदार ते इतर गुंतवणूकदारांकडून विकत घेतात. गुंतवणूकदारासाठी आयपीओ हा खूप मोठा फायदा होऊ शकतो, परंतु त्याआधी आयपीओची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

IPO म्हणजे काय?

ज्याप्रमाणे विविध उत्पादने बाजारात लॉन्च केली जातात, त्याचप्रमाणे स्टॉक देखील लॉन्च केले जातात जेथे कंपनीचे नाव शेअर बाजारात प्रथमच सूचीबद्ध होते, ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग खुला होतो. या प्रक्रियेला IPO म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात.

एखादी कंपनी IPO का आणते?

जेव्हा कंपनीला वाढीसाठी किंवा कंपनीच्या विस्तारासाठी अधिक पैशांची आवश्यकता असते, तेव्हा ती प्रथम शेअर बाजारात प्रवेश करते आणि लोकांकडून पैसे गोळा करते आणि त्या बदल्यात ती लोकांना शेअर्स जारी करते. तुमच्या मनात प्रश्न येईल की जर कंपनीला पैशाची गरज असेल तर ती बँकेकडून कर्जही घेऊ शकते. तर उत्तर असे आहे की बँकेच्या कर्जाचा व्याजदर सहसा जास्त असतो. दुसरीकडे, जर कंपनी आयपीओ घेऊन आली, तर ती एकरकमी निधी मिळवण्यास मदत करते, ज्याचा वापर कंपनीचे कर्ज फेडणे, संशोधन आणि विकास, व्यवसाय वाढवणे इत्यादी विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो.

IPO मध्ये गुंतवणुकीचे फायदे

IPO मध्ये गुंतवणूक करणे अनेक गुंतवणूकदारांसाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना सुरुवातीला उच्च वाढीची क्षमता असलेल्या कंपनीत गुंतवणूक करण्याची सुविधा मिळते. याद्वारे तुम्ही कमी किमतीत शेअर्स खरेदी करू शकता आणि मोठा परतावा मिळवू शकता.

जर एखाद्या किरकोळ गुंतवणूकदाराला स्टॉक मार्केटमधील असूचीबद्ध कंपनीच्या भविष्यातील वाढीवर पूर्ण विश्वास असेल आणि त्याला त्यात गुंतवणूक करायची असेल तर तो त्याच्या IPO ची नक्कीच वाट पाहतो.

हे पण वाचा :- Chandra Grahan 2022: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण संपले ! शुद्धीकरणासाठी पटकन ‘हे’ काम करा