अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  आज दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी आदर्शगाव हिवरेबाजार येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेचे आनंदी १०० दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी नगर सह्याद्री वृत्तपत्राचे मुख्य संपादक व शहर प्रेस क्लबचे अध्यक्ष मा.शिवाजीराव शिर्के,दैनिक लोकमतचे निवासी संपादक मा.सुधीरजी लंके ,स्नेहालय चे संस्थापक अध्यक्ष मा.गिरीशजी कुलकर्णी,घरघर लंगर उपक्रमाचे संचालक मा.हरजितसिंग वधवा साहेब व त्यांचे सहकारी ,

उद्योजक मा.जनकशेठ आहुजा,सर्व वृत्तपत्राचे पत्रकार बंधू,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी सदस्य ,दुध डेअरी सदस्य व परिसरातील सरपंच, पालक,ग्रामस्थ,कोविड फ्रंटलाईन वर्कर,आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांनी सर्वांचे स्वागत करून शाळा सुरु करण्यामागील पार्श्वभूमी सांगितली.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी आमच्या या उपक्रमाला मूकसंमती दिली.त्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव आम्ही घेणार आहोत.परिसरातील पालकांच्या सहकार्याशिवाय शाळा सुरु करणे शक्य नव्हते.

सर्वांनी एकमताने शाळा सुरु करण्यास संमती दिली व सर्व जबाबदारी घेतली म्हणून हे यशस्वी १०० दिवस आज आपण साजरे करू शकलो.शासनाचे नोकर असूनही शिक्षकांनी परवानगी नसताना शाळा चालवली त्यांचे विशेष अभिनंदन केले.सर्व पत्रकारांनी सकारात्मक बातमी देऊन आम्हाला सहकार्य केले याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.शिवाजीराव शिर्के यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गावकऱ्यांचे कौतुक केले.विद्यार्थांनी आपले शाळेचे यशस्वी १०० दिवस या विषयावर जी निबंध व चित्रकला स्पर्धा घेतली त्याचे एक पुस्तक प्रकाशीत करण्याचे सुचविले व याची सर्व आर्थिक जबाबदारी उद्योजक श्री. जनकशेठ आहुजा यांनी घेतली आणि त्याचा प्रकाशन सोहळा लवकरच हिवरेबाजार येथे घेण्यात येईल असे घोषित केले.

यानंतर लोकमतचे निवासी संपादक श्री.सुधीरजी लंके यांनी आपल्या भाषणात विद्यार्थांना क्रिकेट खेळाडूंची उपमा देत शतकवीर म्हणून त्यांचे कौतुक केले.जे मोठमोठ्या लोकांना जमले नाही ते ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांनी करून दाखविले.हिवरे बाजारचे हे कार्य भविष्यात संपूर्ण राज्याला मार्गदर्शक ठरणार आहे.

इतरही गावकरी एकत्र आले तर हे कार्य करू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.घरघर लंगर या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात गरजू लोकांना जेवणाचे डबे देणारे श्री.हरजितसिंह वधवा यांनी सर्वांचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल कौतुक केले व एक दिवस सर्व मुलांना त्यांचा वतीने मिष्टान्न भोजन देण्याचे जाहीर केले.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थांनी उत्स्पुर्तपणे १०० दिवसांचे आपले अनुभव कथन केले.आमच्या बरोबरच राज्यातील इतरही मुलांच्या शाळा सुरु व्हाव्यात अशी इच्छा प्रकट केली.पालकांनी १०० दिवसात अनेक अडचणी आल्या तरी स्वत:च्या मुलांच्या शिक्षणासाठी वेळ देऊन सहकार्य केले.

शाळा सुरु केल्याबद्दल पद्मश्री पोपटराव पवार यांचे आभार मानले व आमच्याही गावात अशा पद्धतीने शाळा सुरु होऊ शकतात फक्त पालकांनी तयारी दाखविली पाहिजे असे मत मांडले. याप्रसंगी श्री.हरिभाऊ ठाणगे सर, एस.टी.पादीर सर,सहदेव पवार गुरुजी,

सरपंच सौ.विमलताई ठाणगे,ग्रामपंचायत सदस्य श्री.रोहिदास पादीर, सौ.सुरेखा पादीर,सौ.मीनाताई गुंजाळ,सौ.रंजना पवार तसेच वैद्यकीय अधिकारी श्रीमती शिवानी कुलकर्णी,श्री.दत्तात्रय शिंदे ,श्रीमती आजबे यशवंत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मुरलीधर अमृते,दीपक ठाणगे,कैलास खैरे ,

नंदकुमार झावरे,सौ.नीता सोनवणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजू शेख,विजय ठाणगे,भास्कर खोडदे,शोभाताई पवार,सुलभ दळवी,रुपाली पवार,सुवर्णा ढवळे यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच परिसरातील पालक श्री.सुर्यकांत येवले,विठ्ठल उरमुडे ,कल्पना पवार,धनश्री गुंड,वसंत कर्डिले,विजया निमसे,शिवाजी वारुळे,अर्चना ठाणगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.