Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खालच्या पातळीत टीका केली. त्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये आणि नेतेमंडळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

पण सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करूनही राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी कोणतेही प्रतिक्रीय न दिल्याने चर्चांना चांगलेच उधाण आले होते.

मात्र अजित पवार यांनी आज मावळ येथील कार्यक्रमात चांगलाच समाचार घेतल्याचे दिसले. अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या सर्वत्र वेगाने पसरल्या होत्या. त्याला आज अजित पवार यांनी चांगलेच उत्तर दिले आहे.

सुप्रिया सुळे यांना कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल अजित पवार यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही असे विचारण्यात आले असता त्यांनी अजित पवार यांची पाठराखण केल्याचे दिसले होते.

अजित पवार हे वयक्तिक कार्यक्रमासाठी ५ दिवस बाहेर गेले होते. मात्र त्या ५ दिवसांत अजित पवार नाराज असल्याच्या बातम्यांना पूर आला होता. त्या बातम्यांचा अजित पवारांनी चांगलाच संचार घेतला आहे.

अजित पवार मावळमधील कार्यक्रमात बोलताना म्हणाले, मी नाराज असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मी पाच दिवस आजारी होतो. मला खोकला लागला होता. त्यामुळे मी लोकांसमोर आलो नाही असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.

सहा महिन्यांपूर्वी माझा बाहेरचा दौरा ठरला होता. त्यामुळे मी 4 तारखेला रात्री उशिरा दीड वाजता फ्लाईट पकडून गेलो. काल रात्री उशिरा आलो. पण इथे माझ्याबद्दलच्या काहीही बातम्या सुरू होत्या. गैरसमज निर्माण केला गेला असे पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्याबाबत अशा काही बातम्या इकडे उठवण्यात आल्या. दादा इकडे गेले. दादा तिकडे गेले. दादा नाराज आहेत, दादा अमकं आहेत. काय दादा वाचून यांचं नडतं कुणाला माहिती.

दादाला काही खासगी लाईफ आहे की नाही? वारेमाप प्रचार केला. कारण नसताना बदनामी करायची, कारण नसताना गैरसमज निर्माण करायचे, हे बरोबर नाही अशा शब्दात अजित पवारांनी अफवा पसरवणाऱ्यांना इशारा दिला आहे.