मुंबई : राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून आणि हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर मनसे कार्यकर्त्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात (Maharashtra) लाऊडस्पीकरचा मुद्दाच नाही. तणाव निर्माण करण्याचा दंगे घडवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण हा मुद्दा उठलाच नाही. प्रश्नच येत नाही.

गृहमंत्र्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण असावं. देशभरात ते लागू करावं. इथे जात आणि धर्माचा विषय येत नाही. मशिदीवरील (masjid) भोंग्याचा विषय ज्यांनी काढला.

त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला. भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला. या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज हिंदू समाज आहे.

त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडायचा प्रयत्न केला. त्यांना हिंदू धर्मात गट करून आपआपसात दंगली घडवायच्या आहेत असे संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, पण सुदैवाने महाराष्ट्रात असं काही होऊ शकलं नाही. या राज्यातील जनता सुजाण आहे असेही राऊत म्हणाले आहेत.

कायद्याचं राज्य चालतं. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहेत. त्यानुसार काम होत असतं. महाराष्ट्रात शांतता आहे. संघर्ष नाही. कोणत्याही समुदायात ताणतणाव नाही. सर्व ठिक आहे.

काही लोकांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. पण महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्याला उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात हे चालणार नाही. देशातही चालणार नाही.

पण भोंग्याबाबतचं एक धोरण असावं. आम्ही आधीही सांगितलं आहे. संपूर्ण देशासाठी हे धोरण असावं. केंद्र सरकारला ते करावं लागेल, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या युरोप दौऱ्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले, आज स्वयंपाकाचा गॅस महागला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महागाईवर बोलायला कोणीच तयार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाऊन आले. त्यांना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. त्यात ते मध्यस्थी करत आहेत. त्यांचे भक्त त्यांची वाहवा करत आहेत.

पण या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर, बेरोजगारी या संदर्भात भाजपचा एक तरी नेता किंवा मंत्री बोलतोय का? भोंग्यावर कसले बोलता याच्यावर बोला.

सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा आणि महागाईवर बोलणं तुमचं कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला खडसावले आहे.