file photo

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत आहेत. अशावेळी आघाडी सरकारचे मंत्री मात्र स्वतःला लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत.

राज्यातील जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी असल्याची टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. आघाडी सरकारवर लक्ष्मी रूसलीय की प्रसन्न आहे, माहीत नाही.

मात्र, हे स्वतःलाच लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत. आज राज्यातील सामान्य नागरिक, शेतकरी अडचणीत आहेत. पण महसूल गोळा करण्यात मंत्र्यांचा वेळ चाललाय.

शेतकरी उपाशी आणि मंत्री तुपाशी अशी अवस्था झाली असल्याचा घणाघात विखे-पाटलांनी केलाय. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी केले आहेत.

मात्र, यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टिका केली होती. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांचा समाचार घेतला. महसूल मंत्र्यांचा अभ्यास कमी पडतोय.

केंद्राने जीएसटी थकवला ही वस्तुस्थिती नसून राज्यातील मंत्र्यांचा केंद्राकडे बोट दाखवण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. आपल्या दिव्याखाली अंधार आहे ना?

राज्यातील मंत्र्यांनी भ्रष्टाचारातून थोडं बाजूला येवून जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, असा खोचक टोला विखे पाटील यांनी थोरातांना लगावलाय.