अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औरंगाबादमधील भाषण महाविकास आघाडीच्या सरकारने गांभीर्याने घेतले आहे. त्यांच्या भाषाणाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचा एक गट काम करीत आहे.

याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. भाषणानंतर पाटील प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले,

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार व यंत्रणा कठोर कारवाईसाठी २४ तास सज्ज आहे. ही कारवाई कठोर म्हणजे नक्की काय असेल, हे आपण आताच सांगू शकत नाही.

मात्र कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याची तीव्रता जितकी असेल, तितकीच कारवाई कठोर होईल, इतकेच या घडीला आपण सांगू शकतो, असे पाटील म्हणाले.

औरंगाबादमधील भाषणाच्या वेळी भोंग्यावर अजान वाजली. त्यामुळे राज ठाकरे चिडले आणि म्हणाले, एकदा काय ते होऊनच जाऊ द्या. राज यांचे हे वक्तव्य सरकार आणि पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे.

पोलिसांना चौकशीच्या सूचना देताना सरकारने जनतेला संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या सभेत ठाकरे यांनी शिवसेना भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस तेही खास करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले होते.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्था आहे. गृहमंत्रालय राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहे. त्यामुळे यासंबंधी काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.