Jio Recharge Plan : जिओ (Jio) ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी (Telecom Company) आहे. या कंपनीने अल्पावधीतच ग्राहकांच्या मनावर राज्य केले.

जिओ आपल्या ग्राहकांसाठी (Jio customers) सतत नवनवीन प्लॅन घेऊन येते. जिओ असेच काही प्लॅन (Jio Plan) घेऊन आली आहे त्यामुळे ग्राहकांना वर्षभर रिचार्ज करण्याची गरज पडत नाही. कोणते आहेत ते प्लॅन पाहुयात.

 2,545 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉल, दररोज 1.5GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळतात. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक जिओ अॅप्सचे (Jio Apps) फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते जे खूप उपयुक्त आहे. या प्लॅनची ​​वैधता पूर्ण वर्षासाठी म्हणजेच 365 दिवसांची आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना पुन्हा पुन्हा रिचार्ज (Jio Recharge) करण्याची गरज नाही.

2897 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस प्रतिदिन 2GB डेटा प्रतिदिन दिला जातो. जसे आम्ही सांगितले की आज आम्ही फक्त 365 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत, त्यामुळे या प्लॅनची ​​वैधता देखील एक वर्षासाठी आहे.

2,999 रुपयांचा प्लॅन

वर्षभराच्या वैधतेसह येणारा हा Jio चा सर्वात महागडा प्लान आहे, ज्यासाठी 3000 रुपये भरावे लागतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2.5GB डेटा आणि 100 SMS दिले जातात आणि त्याची वैधता इतर प्लॅनप्रमाणे 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना काही ट्रेंडिंग OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.