Jio Recharge :  रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना स्वस्त प्लॅन (cheaper plans) ऑफर करण्यासाठी ओळखले जाते. Jio कडे असे अनेक प्लान आहेत जे Airtel आणि Vodafone Idea पेक्षा खूपच स्वस्त आहेत.

आज आम्‍ही तुम्‍हाला जिओच्‍या अशा प्‍लॅनची ओळख करून देणार आहोत, ज्‍यामध्‍ये 240 रुपयांमध्‍ये संपूर्ण महिनाभर दररोज 2GB डेटा मिळतो. जिओचा हा प्लॅन वेबसाइट तसेच मोबाईल अॅप (MyJio) द्वारे उपलब्ध आहे. हे प्लॅन नवीन नाही. हे प्लॅन मासिक आधारावर येत नाही. हे प्लॅन 84 दिवसांसाठी येतो . रिलायन्स जिओच्या या उत्तम प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊया

240 रुपयांचा 2GB डेटा प्रतिदिन प्लॅन

आम्ही येथे ज्या रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनबद्दल बोलत आहोत तो 719 रुपयांचा प्लान आहे. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/दिवसासह एकूण 168Gb डेटा 84 दिवसांसाठी मिळतो.  JioSecurity, JioCloud, JioCinema आणि JioTV या प्लॅनसह मोफत सबस्क्रिप्शन मिळते. 2GB डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64 Kbps पर्यंत घसरतो.

239 रुपयांमध्ये 1.5GB डेटा

जर या प्लॅनची महिन्याला गणना केली तर त्याची मासिक किंमत सुमारे 240 रुपये आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 239 रुपयांमध्ये, Jio वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा ऑफर करते. त्यामुळे जर तुम्हाला दररोज 1.5GB किंवा अधिक डेटा हवा असेल तर हा प्लान निवडणे चांगले.