Jio Vs Airtel : अरटेल आणि जिओ या दोन्ही कंपनींनकडे असे अनेक रिचार्ज आहेत, ज्यामध्ये उपलब्ध फायदे जवळपास सारखेच आहेत. देशातील बहुतेक दूरसंचार ग्राहक कमी किमतीत अधिक लाभांसह प्लॅन रिचार्ज करण्यास प्राधान्य देतात. परंतु, असे काही लोक आहेत जे फक्त इनकमिंग कॉलसाठी रिचार्ज करतात. जेणेकरून त्याचा नंबर चालू राहील.

अशा परिस्थितीत, दोन्ही कंपन्या (Jio vs Airtel Recharge Plan) 24 दिवसांचा प्लॅन ऑफर करत आहेत. आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत की एअरटेल आणि जिओ टेलिकॉम कंपनी 24 दिवसांच्या वैधतेसह कोणत्या प्लॅनवर सर्वोत्तम ऑफर देत आहे. चला जाणून घेऊया…

Airtel vs Jio 24 दिवसांचा रिचार्ज प्लॅन

आम्ही या लेखात ज्या प्लॅनबद्दल बोलत आहोत त्यामध्ये Airtel Rs. 155 प्लॅन आणि Jio Rs. 179 प्लॅनचा समावेश आहे. या दोन्ही रिचार्जमध्ये कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचे फायदे जवळपास सारखेच आहेत, आज आम्ही तुम्हाला प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी संपूर्ण माहिती देणार आहोत.

एअरटेलचा 155 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

नुकताच Airtel ने आपला 155 रुपयांचा रिचार्ज प्‍लॅन सादर केला आहे जो 24 दिवसांची वैधता देतो. एअरटेलच्या 155 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 300 एसएमएससह 1 जीबी 4जी डेटा दिला जात आहे.

दुसरीकडे, व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. म्हणजेच, या प्लॅनमध्ये प्रीपेड यूजर्सना मोफत कॉलिंग दिले जाते, जे संपूर्ण महिना वापरता येईल. यासोबत एअरटेलच्या प्लॅनमध्ये फ्री हेलोट्यून्स आणि फ्री विंक म्युझिक सब्सक्रिप्शनही दिले जात आहे.

जिओचा 179 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जर आपण 179 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोललो, तर या रिचार्जमध्ये 24 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तर, प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 24 जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय, दररोज मिळणारा डेटा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो.

त्याच वेळी, रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये, अमर्यादित व्हॉइस कॉलिंगच्या फायद्याशिवाय, तुम्ही कोणतेही पैसे न भरता सर्व नेटवर्कवर लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकता. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस ऑफर केले जातात. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये यूजर्सला JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.