Ahmednagar News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा वाढदिवस आहे. त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर्षीही खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे, ‘प्रिय अण्णा, आपण लष्करातील माजी सैनिक आहात. त्यामुळे भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक तेढ, ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत.

त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा.’भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे.

मात्र, यावर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. तोच धागा पकडून आव्हाड यांनी हे ट्विट केले आहे. मात्र, त्यांनी या विषयात हजारे यांना ओढण्याचा प्रयत्न केला आहे.गेल्यावर्षीही आव्हाड यांनी अशाच खोचक शुभेच्छा दिल्या होत्या.