job news ; शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी १३ मे २०२२ रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात गुजरात मधील सुझीकी मोटार कंपनीत २०० जागा भरल्या जाणार आहेत. अशी माहिती आयटीआयचे सहाय्यक आंतरवासिता सल्लागार (तंत्रज्ञान) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या रोजगार मेळाव्यात फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट,टूल अंड डिझाईन मेकर, इलेक्ट्रिशन, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, ऑटोमोबाईल, ट्रॅक्टर मेकॅनिक, पेंटर या ट्रेड मध्ये २०१७ ते २०२१ या कालावधीत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना रोजगारांची संधी आहे.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांना आयटीआय मध्ये ६० टक्के व दहावी मध्ये ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्यात येताना उमेदवारांनीही शैक्षणिक कागदपत्रांच्या दोन प्रती, २ पासपोर्ट फोटो व आधारकार्ड सादर करावेत. असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही करण्यात आले आहे.