Job Vacancy : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. या तरुणांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी (Chance) आहे.

राज्यात(State) सध्या बेरोजगार तरुणांची (Unemployed youth) संख्या वाढली आहे. त्यासाठी, केंद्र सरकार पाऊल उचलत आहे.

राज्यातले केंद्र सरकार(Central Govt) हे येत्या 18 महिन्यांत तब्बल 10 लाख तरुणांची भरती (Recruitment) करणार आहे.

 केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी गुरुवारी सांगितले की, देशातील सर्वोच्च नोकरशाही सेवा IAS-IPS ची 2300 हून अधिक पदे रिक्त आहेत.

ते म्हणाले की, सर्व संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या वर्षी जूनमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय विभाग आणि मंत्रालयांमधील रोजगार परिस्थितीचा आढावा घेतला होता.

सरकारने पुढील 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश दिले होते. 

लवकरच रिक्त पदांवर भरती होणार आहे

गुरुवारी, भाजप खासदार सुशील कुमार यांच्या प्रश्नाच्या उत्तरात जितेंद्र सिंह म्हणाले की, 1 मार्च 2022 पर्यंत केंद्र सरकारमध्ये 9.79 लाख पदे रिक्त आहेत, त्यापैकी 2.93 लाख रेल्वे, 2.64 लाख संरक्षण मंत्रालयातील आहेत.

गृह मंत्रालयाकडून 1.43 लाख आणि पोस्ट विभागाकडून 90,050 संबंधित आहेत. जितेंद्र सिंह म्हणाले की, गट अ मध्ये 23 हजार 584 पदे, ब गटात 1 लाख 18 हजार 807 पदे रिक्त आहेत.

तर गट क मध्ये 8 लाख 36 हजार 939 पदे रिक्त आहेत.

2014 नंतर 7 लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या

यादरम्यान जितेंद्र सिंह यांनी असेही सांगितले की 2014 पासून आतापर्यंत 7 लाख 22 हजार 311 लोकांना केंद्रात नोकऱ्या मिळाल्या आहेत. 

या कालावधीत म्हणजेच गेल्या 8 वर्षात 22 कोटींहून अधिक लोकांनी नोकऱ्यांसाठी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे देशातील महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत.

यासाठी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या या घोषणेमुळे देशातील बेरोजगारी काही प्रमाणात कमी होणार आहे.