जॉब्स

Pune Bank Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांनाही मिळेल बँकेत नोकरी करण्याची संधी; पुण्यात ‘या’ ठिकाणी निघाली भरती!

Published by
Ahmednagarlive24 Office

Pune Merchants Co-operative Bank : पुण्यात एका प्रसिद्ध बँकेत भरती निघाली असून, या भरती अंतर्गत विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तुम्ही सध्या बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत ते पुढीलप्रमाणे :-

पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, शिपाई/ड्रायव्हर” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज पासून 20 दिवस आहे. त्यानुसार उमेदवारांनी आपले अर्ज पाठवावेत.

शैक्षणिक पात्रता

मुख्य कार्यकारी अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, बँकिंग क्षेत्रातील सिनियर पदाचा कमीत कमी ८ वर्षाचा अनुभव आवश्यक.

सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, बँकिंग क्षेत्रातील अकौंट विभाग/कर्ज विभाग/गुंतवणूक विभाग इ. चा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव आवश्यक.

शाखाधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थांची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बैकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका सहकारी बँकेतील किमान ५ वर्षाचा ऑफीसर / शाखाधिकारी पदाचा अनुभव आवश्यक. MS-CIT/समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक.

शिपाई/ड्रायव्हर : 10 वी उत्तीर्ण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक. तीन चाकी/चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

ऑफलाईन अर्ज “मुख्य कार्यालय : 257, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरासमोर, पुणे ४११००२” या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

ई-मेल पत्ता

ऑनलाईन अर्ज career@pmcbl.com या ई-मेल पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्यासाठी आजपासून 20 दिवसांचा वेळ असेल.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.pmcbl.com/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

-ऑनलाईन अर्ज career@pmcbl.com या ईमेलद्वारे सादर करायचे आहेत.

-तर ऑफलाईन अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

-अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, आजपासून 20 दिवसांपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office