जॉब्स

अहमदनगर मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ बँकेत निघाली नवीन भरती ; कुठे करणार अर्ज, कोणते उमेदवार राहणार पात्र ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Bank Job Vacancy : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची आणि नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच एक मोठी गोड बातमी समोर आली आहे. विशेषतः ज्यांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. कारण की अहमदनगर मध्ये बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर मधील प्रवरा सहकारी बँक येथे विविध रिक्त पदांसाठी एक भरती आयोजित करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे यासाठीची अधिसूचना देखील सदर बँकेच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज देखील मागवले जात आहे. यामुळे आज आपण या पदभरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवरा सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

आरबीआयच्या फिट अँड प्रॉपर क्रायटेरियानुसार या पदासाठी उमेदवार पात्र केले जाणार आहेत. अर्थातच आरबीआयने मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी जो क्रायटेरिया सेट केलेला असेल त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. याबाबतची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला भरतीची अधिसूचना वाचावी लागणार आहे.

नोकरी कुठे करावी लागणार

या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला अहमदनगर मध्ये नोकरी करावी लागणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

यासाठी ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. hrdept@pravarabank.com या बँकेच्या अधिकृत ईमेल आयडीवर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज विहित मुदतीत पाठवता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वर दिलेल्या ईमेल आयडीवर 4 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. तथापि उमेदवारांनी विविध कालावधीमध्येच आपला अर्ज ईमेल आयडी वर सेंड करणे आवश्यक आहे. विहित कालावधी उलटल्यानंतर सादर झालेल्या अर्जांवर विचार होणार नाही याची नोंद घ्यायची आहे.

जाहिरात कुठं पाहणार?

या पदभरतीची जाहिरात  या लिंक वर जाऊन पाहता येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office