Ahmednagar Merchant Co-Op Bank : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लि, अहमदनगर अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लि, अहमदनगर अंतर्गत “I.T. पायाभूत सुविधा व्यवस्थापन अधिकारी, सुरक्षा आणि ऑडिट अनुपालन अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.
मर्चंट को-ऑप बँक लि, अहमदनगर अंतर्गत भरती
वरील भरती अंतर्गत I.T. पायाभूत सुविधा व्यवस्थापन अधिकारी, सुरक्षा आणि ऑडिट अनुपालन अधिकारी पदांच्या एकूण 02 जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
शैक्षणिक पात्रता
-पदांनुसार शैक्षणिक पात्रात वेगवगेळी असेल
-I.T. पायाभूत सुविधा व्यवस्थापन अधिकारी पदासाठी BEIT/BE Comp./MCS / MCA (Any Certification e.g. CCNA, CCNP, MCSE, ITIL be preferred) असणे आवश्यक आहे.
-सुरक्षा आणि ऑडिट अनुपालन अधिकारी पदासाठी BEIT/BE Comp./MCS/ MBA/MCA (Any Certification e.g. CA/CISSP/CISA/CEH/ DISA will be preferred. असणे आवश्यक आहे.
अर्जदारांनी लक्षात घ्या ही भरती अहमदनगर येथे होत असून येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 27 ते 45 वर्षे इतके हवे. तसेच येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पाठवायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी recruitment@amcbank.in
या ई-मेलचा वापर करातर ऑफलाईन अर्ज ‘No. 33, Market Yard, Station Road, Ahmednagar – 414 001. Phone (0241) 2322222’ या पत्त्यावर पोस्टाने पाठवा. ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरती संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत www.amcbank.in या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचे आहेत. उमेदवारांनी सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा. तसेच अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अन्यथा अपूर्ण अर्ज नाकारले जातील याची काळजी घ्या. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती
जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.