AIESL Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना एयर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; थेट लिंकद्वारे करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AIESL Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायाचे आहेत. तुम्ही खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करू शकता. या भरती साठी शैक्षणिक पात्रता तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढीलप्रमाणे :-

एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत “पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी – सहाय्य सेवा” पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी अर्जदार पदवीधर असला पाहिजे. तसेच यासाठी वयोमर्यादा 31 ते 33 वर्षे इतकी आहे, तुम्ही देखील अर्ज करण्यास इच्छुक असाल तर येथे क्लिक करा, या लिंकद्वारे तुम्ही तुमचे अर्ज सादर करू शकता. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.aiesl.in/ ला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारचे सादर करायचे आहे.
-ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची 15 जानेवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.