अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑफिसर पदांसाठी 350 जागांवर नोकरीची संधी आली आहे
पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणं मिळवलेले असणं आवश्यक आहे. संगणकाची प्राथमिक माहिती असणं आवश्यतक आहे.या पदासाठी उमेदवाराला अर्ज भरायचा असेल तर किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वयाची अट – अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 35 ते 38 वर्ष असणं आवश्यक आहे. 1 एप्रिल 2019 पर्यंत उमेदवाराचे वय 35 किंवा 38 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे.
पगार – या पदांसाठी साधारण 31 हजार 705 ते 45 हजार 950 व 42 हजार 20 ते 51 हजार 490 रुपये पगार असू शकतो.
अर्ज – उमेदवाराने अर्ज करण्यासाठी (www.bankofmaharashtra.in)या संकेत स्थळाला भेट द्यावी
मुदत – ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे.
परीक्षा – ऑनलाइन परीक्षेची तारीख अद्याप जाहीर नसली झाली तरी फेब्रुवारी किंवा मार्च 2020 दरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.