Air Force School Pune : शेवटची संधी! पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध शाळेत नोकरी हवी असेल तर आजचं करा अर्ज…

Content Team
Published:
Air Force School Pune Bharti

Air Force School Pune Bharti : पुण्यातील हवाई दल शाळा अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, यासाठी अर्ज कशाप्रकारे करता येईल हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

वरील भरती अंतर्गत ”विशेष शिक्षक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी उमेदवाराचे B.Ed झालेले असावे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात होत आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

ई-मेल पत्ता

अर्ज recruitmentatafsvn@gmail.com या ई-मेलवर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज 22 मे 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास या www.airforceschoolpune.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 28500/- रुपये इतका पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत.

-लक्षात घ्या दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

-लक्षात घ्या अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 असून, उमेदवारांकडे अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे.

-भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवाराने भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News