AFMC Pune Bharti 2024 : पुण्यातील आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, यासाठीची भरती सूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, पाहुयात…
वरील भरती अंतर्गत “लोकसंख्या शास्त्रज्ञ” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगदोर सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी लोकसंख्या अभ्यासात पीएचडी झालेला उमेदवार अर्ज करण्यास पात्र असेल.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज मुख्य अन्वेषक, AFMC-नंदुरबार सहयोगी प्रकल्प, अंतर्गत औषध विभाग, सोलापूर रोड, AFMC, पुणे-40 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://afmc.nic.in/ ला वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज हा पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे देखील महत्वाचे आहे.
-या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगदोर आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.