Bank Bharti 2024 : जीएस महानगर सहकारी बँक मुंबई अंतर्गत भरती सुरु, लवकर करा अर्ज….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज खाली दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत “महाव्यवस्थापक (IT/क्रेडिट/ऑडिट/HR), प्रकल्प व्यवस्थापक – IT, डेटाबेस प्रशासक (DBA), मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), मुख्य जोखीम अधिकारी (CRO), मुख्य अनुपालन अधिकारी (CCO), वरिष्ठ शाखा व्यवस्थापक” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.

येथे अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची असेल. पदवीधर उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र असतील. ही भरती मुंबई येथे होत असून, अर्ज recruit2021@mahanagarbank.com या ईमेलवर सादर करायचे आहेत.

ईमेलद्वारे अर्ज करण्याची सादर शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे. या भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://mahanagarbank.net/ ला भेट देऊ शकता.

अशा प्रकारे करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेद्वारे सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2024 आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.