BARC Mumbai Bharti 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत “तंत्रज्ञ/बी” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 22 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित पत्त्यावर अर्जासह हजार राहायचे आहे.
वरील भरतीसाठी 10 वी 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. तरी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून आपले अर्ज पाठवावेत.
या भरतीसाठी मुलाखत कॉन्फरन्स रूम नं. 2, तळमजला, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई-400 094 या पत्त्यावर आयोजित करण्यात आली आहे. तसेच यासाठी वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे.
या भरती विषयी आणखी माहिती हवी असल्यास, अधिकृत वेबसाईट https://www.barc.gov.in/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया :-
-वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे, तरी उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
-मुलाखतीकरिता 22 फेब्रुवारी 2024 रोजी अर्जासह हजार राहायचे आहे.
मुलाखतीस येताना सोबत आवश्यक कागदपत्रे आणावीत. तसेच मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.