MSSDS Mumbai Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई अंतर्गत “कौशल्य अभियान अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, सहायक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांनी आपले अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल, ती पुढीलप्रमाणे :-
कौशल्य अभियान अधिकारी :- सेवानिवृत्त मंत्रालयीन कक्ष अधिकारी अथवा कोणतेही क्षेत्रीय विभागाच्या मुख्यालयात किमान ५ वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी असावेत.
सहायक लेखा अधिकारी :- नामांकित संस्थेतून वाणिज्य/लेखा/वित्त शाखेची पदवी (किंवा समतुल्य) लेखा/अंकेक्षण/कॉस्टिंग मधील किमान 8 वर्षांचा अनुभव, वित्त/लेखा, अंदाजपत्रक, वित्तीय नियंत्रण, टीम मॅनेजमेंट आणि प्रशासनाचा अनुभव.
सहायक :- शासकीय सेवेतून लिपिक संवर्ग पदावरून सेवानिवृत्त असावा.
अर्ज registrar@mssds.in या ई-मेल द्वारे सादर करायचे आहेत, अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील गरजेचे आहे, लक्षात घ्या अर्ज 23 फेब्रुवारी 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत. भरती संबंधित आणखी माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट kaushalya.mahaswayam.gov.in ला भेट देऊ शकता.
अशा प्रकारे करा अर्ज
-वरील पदांकरिता ऑनलाईन अर्ज registrar@mssds.in या ई-मेल द्वारे सादर करायचे आहेत, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.